आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Is Why Juhi Chawla Stop Working With Aamir Khan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जूहीने आमिरसोबत काम करणे का केले होते बंद, हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आमिर खान 53 वर्षांचा होत आहे. 14 मार्च, 1965 मध्ये मुंबईमध्ये त्याचा जन्म झाला. आमिरने अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली. काही हिरोइनसोबत त्याची जोडी खुप हिट ठरली. जूही चावला यामधील एक अभिनेत्री आहे. जूहीसोबत आमिरची जोडी खुप हिट ठरली. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. परंतू एक काळ असा आला की, जूहीने आमिरसोबत काम करणे बंद केले. जूहीने असे का केले याविषयी या पॅकेजमध्ये आम्ही सांगणार आहोत.


आमिरने उडवली होती खिल्ली
1988 मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' मध्ये आमिर खान आणि जूही चावलाने लीड स्टार्स म्हणून डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. दोघांची जोडी सर्वांना खुप आवडली. याच चित्रपटात त्यांची चांगली मैत्रीही झाली. परंतू आमिरच्या एका विनोदाने दोघांची मैत्री तुटली आणि नंतर त्यांनी कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केले नाही.

 

- 'इश्क'(1997) चित्रपटाच्या सेटवर आमिरने जूहीची खिल्ली उडवली होती. एकदा हे दोघंही चित्रपटाच्या सेटवर बसलेले होते. आमिर जुहीला म्हणाला की, मला ज्योतिष येते, मला तुझा हात दाखव. जूहीने आपला हात दाखवला तर आमिर तिच्या हातावर थुंकून निघून गेला. यानंतर जूही खुप भडकली आणि सेटवरुन निघून गेली. जूहीने चित्रपटाची शूटिंग करण्यास नकार दिला. परंतू तिने नंतर चित्रपटाची शूटिंग पुर्ण केली आणि यानंतर आमिरसोबत काम करणार नाही अशी शपथच घेतली. यानंतर 5-6 वर्ष हे दोघं बोलत नव्हते. नंतर स्वतः जूहीनेच आमिरसोबत बोलणे सुरु केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा आमिर जूहीविषयी अजून काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)