आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई श्रीदेवी गेल्यानंतर सैफची मुलगी साराने जान्हवीला असे सावरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला निधन झाले. श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या दोन्ही मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. अशा वेळी सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने घरी जाऊन जान्हवीला सांभाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारा अली खान जान्हवीला भेटायला घरी गेली होती. तिने या दुःखदप्रसंगी जान्हवीचे सात्वन केले आणि तिची गळाभेट घेतली. सारा आणि जान्हवी यांना जास्त वेळ बोलता आले नाही. सारा जेव्हा सारा ज्यावेळी जान्हवीला भेटायला गेली तेव्हा तिच्या हाता काहीतरी पॅकेट होते. ती जान्हवीसाठी काही खायला घेऊन गेली असावी.


दोन्हीही करत आहेत बॉलिवूडमध्ये डेब्यू...
जान्हवी आणि सारा दोघीही बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. जान्हवी 'धडक' चित्रपटातून पदार्पण करत आहेत तर सारा 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. अनेक वेळा दोघी एकत्र स्पॉट होत असतात. या लोकांचा एक ग्रुप आहे यामध्ये सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान, शनाया कपूर आणि इतर स्टार्स किड्सचा समावेश आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी-साराचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...