आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताप असूनही अनेक तास पाण्यात उभ्या होत्या श्रीदेवी, असे होते त्यांचे डेडिकेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवींचे निधन होऊन 16 दिवस झाले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने या गोष्टीवर विश्वास ठेवणे अवघड होतेय. डायरेक्टर-प्रोड्यूसर महेश भट्ट यांनी त्यांच्याविषयीचा एक किस्सा शेअर केलाय. हा किस्सा 'गुमराह' चित्रपटाच्या शूटिंगच्या काळातील आहे. 1993 मध्ये आलेला श्रीदेवीचा चित्रपट 'गुमराह' च्या शूटिंगच्यावेळी श्रीदेवी यांना ताप असूनही अनेक तास पाण्यात राहावे लागले होते. 

 

असे म्हणाले महेश भट्ट...
- एका इंग्रजी वेबसाइटला बोलताना महेश भट्ट म्हणाले की, " 'गुमराह' चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी श्रीदेवी यांना एक वॉटर सिक्वेंस करायचा होता. मला कळाले की, श्रीदेवीला ताप आहे म्हणून मी शूटिंग पोस्टपोन करण्याचा विचार केला."
- "मी श्रीदेवीकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली की, तुमची तब्येत खुप खराब आहे. यामुळे आपण नंतर शूटिंग करु. परंतू श्रीदेवीने माझा प्रस्ताव नाकारला आणि शूटिंग करण्यास सांगितले."
- महेश भट्ट पुढे म्हणाले की, "श्रीदेवीला ताप होता, परंतू तरीही शूटसाठी ती तासंतास पाण्यात राहिली. श्रीदेवी इतकी प्रोफेशनल होती की, त्यावेळी त्यांनी एक शब्दही तोंडातून काढला नाही. मी त्यांच्या स्पिरिटला सलाम करतो."


ताप असतानाच 'चालबाज' चे गाणेही केले होते शूट, वाचा पुढील स्लाइडवर...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...