आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Debue:कच-यात फेकलेल्या मुलीला घरी घेऊन आले होते मिथुन, आता करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: मिथुन चक्रवर्तीला तीन मुलांसोबतच एक दत्तक घेतलेली मुलगी आहे. ही मुलगी त्यांना कच-याच्या ढिगा-यात सापडली होती. या मुलीचे नाव दिशानी आहे. तिला तिच्या ख-या आई-वडिलांनी कच-यात फेकले होते. सध्या मिथुन हे आपला मुलगा मिमोहचे लग्न आणि त्याच्यावर रेपच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. 7 जुलैला मिमोहचे लग्न होते. 
- मिथुनची दत्तक घेतलीली मुलगी दिशानी बॉलिवूड डेब्यूची तयारी करतेय. अनेक वर्षांपुर्ऴी एका लिडिंग बंगाली न्यूज पेपरमध्ये वृत्त होते की, एक मुलगी कच-यात पडलेली होती. तिला रडताना पाहून कुणीही तिला घेत नव्हते. परंतू रस्त्यावरून जात असलेल्या व्यक्तीने तिला उचलून घरी नेले. मिथुन यांनी ही बातमी पेपरमध्ये वाचली आणि त्या व्यक्तीला फोन केला. तिला दत्तक घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि सर्व फॉर्मेलिटी पुर्ण करुन मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव दिशानी ठेवले.

- मिथुन यांनी आपली तीन मुलं मिमोह, ऊष्मे, नमाशी चक्रवर्तीप्रमाणे मुलीला वाढवले. त्यांच्याप्रमाणेच तिलाही सर्व सुख सुविधा दिल्या. 
- चित्रपटांशी संबंधीत असलेल्या कुटूंबात वाढलेल्या दिशानीला चित्रपटांमध्ये आवड आहे. ती सलमान खानची मोठी फॅन आहे. दिशानी सध्या न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अॅक्टिंग कोर्स करतेय. तिला चित्रपटांमध्ये आपले करिअर बनवायचे आहे. दिशानी सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह राहते. तिने आपले अनेक फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...