आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buzz:'संजू'च्या कमाईचा भागिदार बनणार संजय, हक्कांच्या बदल्यात मिळणार 21 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' बॉक्सऑफिसवर दबरदस्त कमाई करतोय. चित्रपटाने दूस-या शुक्रवारपर्यंत भारताच्या बॉक्सऑफिसवर 215 कोटींची कमाई केली आहे. चर्चा अशा आहेत की, 'संजू'च्या कमाईमधून 21 कोटी रुपये संजय दत्तला चित्रपटाच्या राइट्सच्या बदल्यात दिले जाणार आहेत. यासोबतच सॅटेलाइट, म्यूझिक आणि डिजिटल राइड्सच्या असणा-या फायद्यातूनही 5 ते 10 टक्के त्याला देणार असल्याचे बोलले जातेय. 


हिरानी यांना संजयला भागीदार बनवायचे आहे
चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी आणि संजय दत्त खुप चांगले मित्र आहेत. यामुळे हा चित्रपट बनवणे सुरु झाले तेव्हा चित्रपटाच्या अधिकाराच्या बदल्यात कती पैसे देणार याविषयी बोलणे झालेले नव्हते. परंतू चित्रपटाची कमाई पाहिल्यानंतर राजकुमार यांना संजयला चित्रपटाचे राइट्स देण्याची इच्छा आहे. हिरानी, फॉक्स स्टार इंडिया आणि संजय दत्तचे जवळचे लोक या विषयी अधिकृत माहिती देण्यास तयार नाहीत. परंतू 21 कोटींची गोष्ट जास्त काळ लपून राहणार नाही.

 

या कारणांमुळे विकले गेले नाही सॅटेलाइट राइट्स
- ट्रेड विशेषज्ञांनुसार, हिरानी अँड कंपनीला माहिती होते की, चित्रपटाला यश मिळणार आहे. यामुळे याचे सॅटेलाइट्स राइट्स रिलीजपुर्वीच विकण्यात आले नाही. आता चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतोय. म्हणून वाढलेल्या किंमतीत राइट्स विकले जाणार आहेत. 

भारतीय बॉक्सऑफिसवर अशी आहे चित्रपटांची 8 दिवसांची कमाई 
Day Collection (In Cr.)
1st 34.75
2nd 38.60
3rd 46.71
4th 25.35
5th 22.10
6th 18.90
7th 16.10
8th 12.50
Total 215.01 Cr.

बातम्या आणखी आहेत...