आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले. हे फोटोज बघून करीना जणू हाडांचा सापळाच झाली, अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया यूजर्सकडून तिला मिळाली आहे. फोटोजवरुन तिला बरेच ट्रोलदेखील करण्यात आले. करीना नीट जेवत जा, असेही काही यूजर्सनी म्हटले. काहींनी तिला कुपोषितही म्हटले. खरं तर करीनाला फिगरविषयी मिळालेल्या या प्रतिक्रिया काही नवीन नाहीत. जवळजवळ 10 वर्षांपूर्वी 'टशन' या चित्रपटासाठी करीनाने साइज झिरो फिगर केली होती. त्यावरुन तिच्यावर टीका झाली होती.
टशनमध्ये करीनाला बघून अचंबित झाले होते फॅन्स..
- 2008 मध्ये यशराज स्टूडिओच्या 'टशन' या चित्रपटात करीनाला बघून सगळेच अचंबित झाले होते.
- या चित्रपटासाठी करीनाने साइज झिरो फिगर केली होती. त्यावरुन तिच्यावर बरीच टीका झाली होती.
- इतकेच नाही तर साइज झिरोवरुन मीडियात नवीन चर्चासत्राला सुरुवात झाली होती. अनेकांचे असे मत होते, की साइज झिरो फिगर करण्यासाठी अभिनेत्री स्वतःच्या शरीराचे हाल करतात.
- तर दुसरीकडे फिटनेस फ्रीक आणि डाएट हेल्थला सपोर्ट करण्यासाठी करीनाचे अनेकांनी कौतुक केले होते.
- बॉलिवूडमध्ये तेव्हापासूनच साइज झिरोचा ट्रेंड सुरु झाला होता. इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेत्री हा ट्रेल फॉलो करु लागल्या.
- पण लवकरच साइज झिरोचा ट्रेंज संपुष्ता आला.
शूटिंग सेटवर वारंवार बेशुद्ध पडायची करीना...
- एका मीडिया रिपोर्टनुसार, 'टशन'नंतर करीनाने लगेचच 'कमबख्त इश्क'च्या शूटिंगला सुरुवात केली होती.
- पण या चित्रपटाच्या सेटवर करीनाना वारंवार बेशुद्ध पडू लागली होती.
- त्यानंतर तिने साइज झिरो फिगरचे खुळ डोक्यातून काढून टाकले होते.
टशनविषयी काय म्हणाली होती करीना...
- काही दिवसांपूर्वी करीनाला साइज झिरो फिगरविषयीचे तिचे मत विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली होती की 10 वर्षांपूर्वी मी फक्त 27 वर्षांची होती.
- त्यावेळी केवळ एका भूमिकेसाठी मी साइज झिरो फिगर केली होती. तो अतिशय सुंदर लूक होता.
- आता साइज झिरोची गोष्ट खूप जुनी झाली आहे. आता फिट राहण्यावर माझा भर आहे, असे करीना म्हणाली होती.
पुढील स्लाईड्सवर बघा, 'टशन' चित्रपटातील करीना कपूरचे साइज झिरो फिगरचे फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.