आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 16 व्या वर्षी भावोजीसोबतच करावे लागले या अॅक्ट्रेसला लग्न, 5 मुलांची झाली आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'मेरे जीने की वजह' या आगामी चित्रपटात झळकणारी अभिनेत्री काजल कुशवाहा एक मॉडेलसुद्धा आहे. यूपीच्या दरई जिल्हा झाशीची रहिवाशी असलेल्या काजलच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार आले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिला सख्ख्या बहिणीच्या नव-यासोबतच लग्न करावे लागले होते. लग्नानंतर सासरी तिचा 16 वा वाढदिवस साजरा झाला होता. लग्नाच्या वेळी तिचे भावोजी तीन मुलांचे वडील होते. बहिणीच्या निधनामुळे काजलला कमी वयातच तिच्या तीन मुलांची आई व्हावे लागले. अलीकडेच DainikBhaskar.comला दिलेल्या मुलाखतीत काजलने तिच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.

 

लग्नाच्या एक महिन्यानंतर सासरी साजरा झाला होता 16 वा वाढदिवस...  

- काजल कुशवाहाने सांगितले, ''माझे पती राजेश कुशवाह लग्नापूर्वी नात्याने माझे भावोजी होते. राजेश माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. जेव्हा माझे त्यांच्याशी लग्न झाले, त्यावेळी मी अतिशय हताश झाली होती.''
- ''लग्नाच्या वेळी माझ्या आईवडिलांनी मला माझा होकार किंवा नकार विचारला नाही आणि तीन मुलांच्या वडिलांसोबत माझे लग्न लावून दिले. लग्नाच्या महिन्याभराने माझा 16 वा वाढदिवस सासरी साजरा झाला होता.''
- ''लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसांत माझे माझ्या पतीसोबत सतत खटके उडायचे. तुमच्याशी लग्न करुन माझे आयुष्य उद्धवस्त झाले, मी आयुष्यात काहीच करु शकले नाही, असे मी त्यांना म्हणायचे.''

 

पतीने डान्स क्लासमध्ये मुलीसोबत माझेही अॅडमिशन केले...
- ''लग्नानंतर मी राजेश यांच्या तीन मुलांची आई झाले. शिवाय माझी स्वतःचीसुद्धा दोन मुले झाली. आता दोन्ही मुले शाळेत जातात.  माझी सर्वात मोठी मुलगी नेहा बीएससी करत आहे. ती टीव्हीवर डान्सिग शो बघून डान्स करायची.''
- ''मुलीला डान्स करताना बघून मलासुद्धा डान्स करायची इच्छा व्हायची. सुरुवातीला खूप लाज वाटायची. पण मुलीच्या आग्रहानंतर मी डान्स करु लागले. हळूहळू मला उत्तम डान्स जमू लागला.''
- ''माझे पती ऑफिसला गेल्यानंतर मी आणि माझी मुलगी डान्सची प्रॅक्टिस करायचे. जेव्हा माझ्या पतीला आमच्या नृत्याच्या आवडीबद्दल समजले, तेव्हा त्यांनी डान्स क्लासमध्ये मुलीसोबत माझेही नाव नोंदवले.''

 

असा सुरु झाला मॉडेलिंगचा प्रवास...
- ''डान्स अॅकॅडमीत माझी भेट मॉडेलिंग प्रोग्राम ऑर्गेनाइजर राहुल कुमार यांच्यासोबत झाली. त्यांनी मला एका कार्यक्रमात रॅम्प वॉक करण्याची संधी दिसली."
- "त्या एका संधीमुळे माझे संपूर्ण आयुष्याच बदलून गेले. रॅम्पवॉकनंतर माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. मी मिसेस उरई ठरले. आणि दिल्लीतील एक मॉडेलिंग स्पर्धेचीही विजेती ठरले. आयुष्यात कधी अशी संधी मिळेल, याचा स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता.''
- ''मला आता 'मेरे जीने की वजह' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. याचे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. माझ्या पतीने नेहमी मला प्रोत्साहन दिले. अनेक इव्हेंट्समध्ये ते माझ्यासोबत उपस्थित असतात. मी आता माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे.'

 

आई-मुलगी मैत्रिणीप्रमाणे राहतात..

- राजेश आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी नेहा सांगते, ''माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. मला माझ्या सख्ख्या आईची कधीही आठवण येऊ देत नाही. आम्ही दोघी अगदी मैत्रिणीसारख्या राहतो. घरी कुणी नसतं, तेव्हा आम्ही डान्स आणि मस्ती करतो."
- ''एक काळ असा होता, जेव्हा आई फक्त घरातील कामे करायची. पण आता तिला रॅम्पवर बघून खूप आनंद होतो.''

 

डिलिव्हरीच्या वेळी झाला होता. राजेश यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू...
- राकेश कुशवाहा यांनी सांगितले, ''काजल माझ्या पहिल्या पत्नीची सख्खी बहीण आहे. माझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू डिलिव्हरीदरम्यान झाला होता. त्यानंतर माझे लग्न काजलसोबत झाले. लग्नानंतर मला काजलपासून दोन मुले झाली."
- ''काजलने अल्पावधीतच मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले. तिच्या यशाचा मला आनंद वाटतो.''


पुढील स्लाईड्सवर बघा, काजलची तिच्या कुटुंबासोबतची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...