आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34th Wedding Ann: एकेकाळी मॉडेल होती अनिल कपूरची पत्नी, दोनदा टाळले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेते अनिल कपूर आणि त्यांच्या पत्नी सुनीता कपूर यांच्या लग्नाचा आज 34 वा वाढदिवस आहे. 19 मे 1984 रोजी दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुनीता कपूर यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर अनिल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिले, “ What was, Still Is”... Today We Celebrate The Best Decision You Ever Made 😉😌😀😀❤️❤️❤️❤️❤️❤️❤️“

 

रंजक आहे लव्ह स्टोरी...

अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता यांची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे.  अनिल सुनीता यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. फार कमी लोकांना माहीत आहे की, सुनीताचा आवाज ऐकण्यासाठी नेहमीच तरसणाऱ्या अनिल यांनी इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांच्या  सांगण्यावरुन दोनवेळा लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. अखेर दोघांनी 19 मे 1984 साली लग्न केले.

 

सुनीताच्या आवाजाचे फॅन होते अनिल कपूर..

जेव्हा अनिल आणि सुनीता एकमेकांना भेटले होते तेव्हा अनिल कपूर एक स्ट्रगलिंग अभिनेता होते आणि त्यांची पत्नी एक प्रसिद्ध मॉडेल. अनिल सुनीताच्या प्रथम भेटीतच प्रेमात पडले होते. दोघांचे बोलणे सुरु झाले तेव्हा अनिल सुनीताच्या आवाजाचे फॅन झाले.


पुढच्या स्लाईडवर वाचा, अनिल आणि सुनीताच्या प्रेमकहाणीबद्दल काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...