आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38th Wedding Anni: स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषी-नीतू, अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत.  ऋषी कपूर त्यांचा लग्नाचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा दिवस मानतात. ऋषी आपल्याच लग्नात बेशुद्ध पडले होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. केवळ ऋषीच नव्हे तर त्यांची पत्नी नीतू सिंहसुद्धा लग्नात भोवळ येऊन पडल्या होत्या. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, त्यांच्या लव्हस्टोरीविषयी... 

 

सेटवर नीतूची छेड काढायचे ऋषी

ऋषी कपूर आणि नीतू सिंह बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. 'जहरिला इन्सान' या सिनेमात ही जोडी पहिल्यांदा झळकली होती. खरं तर हा सिनेमा फार चालला नाही, मात्र या सिनेमामुळेच हे दोघे जवळ आहे. नीतू 14 वर्षांच्या असल्यापासून ऋषी यांना ओळखत होत्या. हा तोच काळ होता, जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. गमतीची गोष्ट म्हणजे ऋषी कपूर सेटवर नीतू यांची जाणूनबूजून छेड काढत असे. कधीकधी नीतू त्यांना वैतागून जायच्या. त्यानंतर हळूहळू नीतू यांनी ऋषी कपूर यांची ही सवय आवडू लागली आणि 'खेल खेल में' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागली होती.

 

नीतू यांना हवा होता 'बॉबी'मध्ये रोल
ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू यांना आर. के. बॅनर्सच्या बॉबी या सिनेमात लीड भूमिका हवी होती. मात्र डिंपल कपाडियाने ही बाजी मारली. खरं म्हणजे राज कपूर यांना 'बॉबी'साठी नवीन आणि फ्रेश चेहरा हवा होता. त्याकाळात नीतू सिंह इंडस्ट्रीत स्थिरावल्या होत्या. त्यामुळे राज कपूर यांनी नीतू यांची निवड या सिनेमासाठी केली नव्हती. मात्र नंतर नीतू आणि ऋषी यांनी ब-याच सिनेमांमध्ये एकत्र काम केले. 'रफू चक्कर', 'दूसरा आदमी', 'कभी-कभी', 'अमर अकबर एंथोनी' या सिनेमातील दोघांची जोडी प्रेक्षकांना भावली.

 

राज कपूर म्हणाले होते, प्रेम आहे, तर लग्न करा..
ऋषी आणि नीतू यांच्या प्रेमाचे किस्से बॉलिवूडमध्ये चांगलेच रंगू लागले होते. नीतू यांचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले होते. याकाळात ऋषी यांच्यासोबतच सिनेमे करण्यावर नीतू यांनी भर दिला होता. नीतू यांना ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न करायचे होते, ही गोष्ट राज कपूर यांच्यासह घरातील ब-याच जणांना ठाऊक होती. राज कपूर यांनी ऋषी यांना म्हटले होते, जर नीतूवर प्रेम असेल तर तिच्याशीच लग्न कर.


लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषी-नीतू
22 जानेवारी 1980 रोजी ऋषी कपूर आणि नीतू सिंग लग्नगाठीत अडकले. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. दोघांचेही लग्न धुमधडाक्यात पार पडले. या दोघांच्या लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली होती. याबद्दल खूद्द नीतू सिंग यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. नीतू यांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी त्या बेशुद्ध पडल्या होत्या. ऋषी कपूर यांनासुद्धा लग्नात भोवळ आली होती. लग्नात नीतू सिंग यांनी परिधान केलेला लहेंगा खूपच भारी होता. तो लहेंगा सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. तर ऋषी कपूर त्यांच्या अवतीभोवती जमलेल्या गर्दीमुळे हैराण झाले होते. घोडीवर चढण्यापूर्वीच त्यांना लग्नात भोवळ आली होती.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नातील आणि खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...