आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्निचरचा बिझनेस करते धर्मेंद्र यांची धाकटी सून, लाइमलाइटपासून राहते दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता बॉबी देओल 27 जानेवारी रोजी 51 वर्षांचा झाला. तीन वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉबीने  'पोस्टर बॉइज' या चित्रपटातून पुनरागमन केले. आता तो लवकरच 'रेस-3' या चित्रपटात झळकणार आहे. मधल्या काळात बॉबीजवळ एकही चित्रपट नव्हता. नैराश्यामुळे तो दारुच्या आहारी गेला होता. या कठीण काळात त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली ती त्याची पत्नी तान्या. तिनेच बॉबीला या कठीण काळातून बाहेर काढले.  तान्या आणि बॉबी यांचे 1996 मध्ये लग्न झाले. दोघांचे लव्ह मॅरेज आहे. धर्मेंद्र यांची ही धाकटी सून मोठ्या व्यावसायिक घराण्यातून आहे. 

 

ग्लॅमर वर्ल्ड पासून कायम दूर राहते तान्या... 
- तान्या एक यशस्वी उद्योजिका आहे. 'द गुड अर्थ' नावाने तिचा स्वतःचा फर्निचर आणि होम डेकोरचा व्यवसाय आहे.
- अनेक बॉलिवूड स्टार्स आणि बिझनेसमन तिचे क्लायंट आहेत. तान्या तिच्या क्षेत्रात यशस्वी ठरली आहे.
-  तान्याने सांगितल्यानुसार, बॉबी कधीच तिच्या कामात दखल देत नाही. तान्याला घरातूनही कायम पाठिंबा मिळतो. चांगले काम झाले की बॉबी आणि सनी दादा दोघेही माझे कौतुक करतात असे ती म्हणते. तान्याने इंटीरीअर डिझायनिंगचा कोर्स केला आहे.
- तान्या ग्लॅमरस जगापासून नेहमची दूर राहिली. ती पेज थ्री पार्टीजमध्येही खुप कमी दिसते. संजय कपूरची पत्नी महिप आणि सोहेल खानची पत्नी सीमा तिच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. बॉबी आणि तान्याचे वैवाहिक जीवन खुप आनंदी आहे. बॉबी देओलला आर्यमान आणि धरम ही दोन मुले आहेत.

 

या चित्रपटांसाठी केले कॉश्च्युम डिझाइन
- तान्याने 2005 मध्ये आलेल्या 'जुर्म' आणि 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'नन्हे जैसलमेर' या चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे.
- याशिवाय ट्विंकल खन्नाच्या 'व्हाइट विंडो' स्टोअरमध्ये तान्याने डिझाइन केलेले फर्निचर आणि इंटेरिअर डेकोर अॅक्सेसरीज लावण्यात आल्या आहेत.

 

बिझनेसमन होते तान्याचे वडील

- तान्या देओलचे वडील देवेंद्र आहूजा 20th सेंच्युरी फायनान्स लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते 
- याशिवाय ते सेंच्युरियन बँकचे प्रमोटरसुद्धा होते. ऑगस्ट 2010 मध्ये हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, बॉबी आणि तान्याचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...