आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रितेशच्या रोज प्रेमात पडते जेनिलिया, पहिल्या भेटीत मात्र केले होते दुर्लक्ष, अशी आहे Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुजा-देशमुख यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस आहे. लग्नानंतर या दोघांच्या संसारवेलीवर रिआन आणि राहील ही दोन गोंडस फुलं उमलली आहे. या खास दिवसानिमित्त जेनिलियाने रितेशसोबतचा एक खास फोटो शेअर करुन मी रोज तुझ्या प्रेमात पडते, असा रोमँटिक मेसेज त्याच्यासाठी लिहिला आहे. ती म्हणते, "Sometimes just sometimes in our ordinary, mundane, boring lives GOD gives us a fairytale and that fairytale for me is our story.. Happy Anniversary to the man who still makes me fall in love with him everyday.. I Love You @riteishd"

 

दहा वर्षे केली होती डेटिंग...  
- लग्नापूर्वी तब्बल दहा वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. 
- सनई-चौघड्यांचा निनाद, शाही मराठमोळ्या पद्धतीने वराती मंडळीने बांधलेले फेटे, राजकारणातील दिग्गज मंडळी आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत लव्हबर्ड रितेश आणि जेनेलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर लग्नगाठीत अडकले होते. 
- दोघांची पहिली भेट हैदराबादमध्ये 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या टेस्ट शूटदरम्यान झाली होती. 
- दोघे एकमेकांचे को-स्टार होते. 

 

पहिल्या भेटीत जेनिलियाने केले होते रितेशकडे दुर्लक्ष...  
- जेनिलिया जेव्हा पहिल्यांदा रितेशला एअरपोर्टवर भेटली तेव्हा त्याला इग्नोर करत होती. कारण ती तिच्या आईसोबत होती.
- रितेशचे वडील दिवंगत विलासराव देशमुख महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. म्हणून तिला वाटले, की रितेशसुध्दा वडिलांप्रमाणे नेताच होईल. परंतु जेव्हा ती त्याला भेटली आणि कुटुंबीयांप्रती त्याचे प्रेम पाहून भारावली. 
- शूटिंगनंतर रितेशने अनेक दिवस जेनिलियाला मिस केले. नंतर दोघांचे फोनवर बोलणे व्हायला लागले. 
- दोघे रात्री कॉफी शॉपवर भेटत आणि तासन् तास गप्पा मारत होते. हळू-हळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 
- दोघे जवळपास 10 वर्षे डेटींग करत होते.
- दोघांपैकी कुणी आधी प्रपोज केले होते, हे त्या दोघांनासुध्दा लक्षात नाहीये. 2012मध्ये रितेश आणि जेनिलिया लग्नगाठीत अडकले. 
- रितेश सांगतो, की जेनिलियाला प्रत्येक गोष्ट स्मरणात राहते. 
- रितेशचे नेहमी बिझी राहणे, जेनिलियाला आवडत नाही. ती सांगतो, की रितेश स्वत:ला प्रत्येकवेळी बिझी दाखवण्याचा प्रयत्न करतो.

 

शाही होता विवाहसोहळा
- रितेश-जेनिलियाच्या शाही विवाह सोहळ्याला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक राजकारणी आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. 
- रितेश आणि जेनिलिया महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठीत अडकले होते.


आज रितेश आणि जेनिलियाच्या लग्नाच्या सहाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नसोहळ्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत... पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रितेश-जेनिलियाच्या लग्नातील निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...