आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः संपूर्ण जगात सध्या व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातोय. या वीकनुसार 8 फेब्रुवारी रोजी 'प्रपोज डे' साजरा केला जातो. या खास दिवसाचे औचित्य साधत लोक आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदाराकडे व्यक्त करतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याची आपली पद्धत वेगळी असावी, असे अनेकांना वाटत असते. वेगवेगळ्या माध्यमांतून प्रपोज करुन लोक आपल्या जोडीदाराला आनंद देतात. सामान्यांप्रमाणेच अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या जोडीदाराला हटके प्रपोज केले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या नावाजलेल्या सात सेलिब्रिटींचे प्रपोजलचे किस्से या पॅकेजमधून सांगत आहोत...
मुंबईच्या समुद्रकिनारी शाहरुख खानने केले होते गौरीला प्रपोज...
शाहरुख खानची लव्ह स्टोरी एखाद्या रोमँटिक सिनेमाला शोभून दिसणारी आहे. प्रेयसीसोबतची पहिली भेट, नंतर तिला प्रपोज करणे, तिच्या प्रेमाखातर विरोधाचा सामना करणे, असे सर्व काही सिनेमांमध्ये दिसत असते. असेच सारे काही घडले आहे एसआरकेच्या खासगी आयुष्यात. दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात एका पार्टीतून झाली. शाहरुखने दिल्लीतील एका पार्टीत गौरीला पहिल्यांदा पाहिले होते. पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. शाहरुखने तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. लवकरच दोघांची मैत्रीसुद्धा झाली. मात्र एसआरकेने मुंबईच्या बीचवर गौरीला प्रपोज केले होते. गौरीने लगेचच शाहरुखच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि एका फिल्मी लव्ह स्टोरीप्रमाणे दोघांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. खरं तर सुरुवातीला गौरीचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. कारण शाहरुख मुस्लिम तर गौरी हिंदू आहे. मात्र अखेर विजय प्रेमाचा झाला आणि दोघांनी 1991 मध्ये लग्न केले.
अभिषेक बच्चनने बालकनीतून केले होते ऐश्वर्याला प्रपोज, वाचा, स्टार्सचे असेच काही किस्से पुढील स्लाईड्सवर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.