आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक चणचणीमुळे त्रस्त आहे ही 70s ची अभिनेत्री, 16 वर्षे मोठ्या डायरेक्टरशी केले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

70 च्या दशकातील अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहेत. दिग्दर्शक बीआर इशारा यांची फिल्म 'चेतना' (1970) मध्ये लहान वयाच्या सेक्स वर्करची भुमिका करून रेहाना सुल्तान प्रसिध्द झाल्या होत्या. या भूमिकेसाठी त्यांना नॅशनल अवॉर्डही आणि पैसाही मिळाला होता. चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स देऊन चर्चेत राहिलेल्या रेहाना सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत. वृत्तांनुसार त्या आर्थिक चणचणीमुळे त्रस्त आहेत. त्यांची परिस्थिती ईतकी वाईट झाली आहे की, टेलीव्हीजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) त्यांना प्रत्येक महिन्यात पैशांची मदत करत आहे. नव-याच्या मृत्यूनंतर राहिले नाही बँक बॅलेन्स...


- रेहानाने 34 वर्षाच्या वयात स्वत:पेक्षा 16 वर्ष मोठे दिग्दर्शक बी आर इशारा यांच्याशी 1984 मध्ये लग्न केले. 
- आपल्या इमेजवर बोलताना रेहाना एका मुलाखतीत म्हणाली होती, की त्या वेळी मी फिल्ममध्ये केवळ एक 'टाइप्ड' अभिनेत्री होते. मी सेक्शुअॅलिटीचे दुसरे नाव आहे असे तेव्हा दर्शकांना वाटत होते. इथपर्यंत की दिग्दर्शकही मला केवळ बाथटब किंवा पावसात भिजण्याचे रोल देत होते. मला याची चिड येत होती.
- रेहानाचे पति बीआर इशारा यांचा 2012 मध्ये मृत्यू झाल. शेवटच्या काळात त्यांनी चित्रपट तयार करणेही सोडले होते. यामुळे रेहानासाटी काही प्रॉपर्टी बँक बॅलेन्स उरले नाही.
- आर्थिक चणचणीमुळे दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी त्यांना 'इनकार' (2013) मध्ये एक भूमिका दिली. या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि चित्रांगदा प्रमुख भूमिकेत होते.
- चित्रपटाच्या दुनियेपासून दूर गेलेली ही अभिनेत्री आता कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. रेहाना सांगतात की, "अभिनय हा कोणत्याही वयात केला जाऊ शकतो. खरेतर आजच्या काळात कॅम-यापासून चित्रपट बनवण्याची पध्दत बदलली आहे. अशा वेळी एखादा डायरेक्टर मला चित्रपटात भूमिका देईल का."

 

कोण आहे रेहाना सुल्तान..
-  नोव्हेंबर, 1950 ला इलाहाबाद येथे रेहानाचा जन्म झाला. रेहाना पुणे येथील FTII ग्रॅज्युएट आहेत. 
- सन 1967 मध्ये अभिनयाची डिग्री मिळाल्यानंतर त्यांना विश्वनाथ अय्यंगर यांचा चित्रपट शादी की पहली सालगिरह मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
- यानंतर निर्माता राजिंदर सिंह बेही यांनी 1970 मध्ये त्यांना दस्तक या चित्रपटात रोल दिला. रेहाना FTII पास अशा एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांनी कोणत्या चित्रपटात लीड रोल केला. 
- रेहानाला दस्तक चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 
- रेहाना यांनी त्यानंतर हार-जीत (1972), प्रेम पर्वत (1973), किस्सा कुर्सी का (1977) यांसारख्या चित्रपटात भूमिका केली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रेहाना सुल्तानविषयी सविस्तर माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...