Home »Gossip» 90s Bollywood Actresses Then And Now

आता अशी दिसते 'आशिकी गर्ल', 90च्या दशकातील या अभिनेत्रींचाही बदलला LOOK

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 00:23 AM IST

मुंबईः 1990 च्या दशकातील सुपरहिट ठरलेल्या 'आशिकी' या सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री अनू अग्रवाल आता 49 वर्षांची झाली आहे. 11 जानेवारी 1969 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या अनूसोबत 1999 मध्ये एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तिने आपल्या 'अनयुज्युअल' (Anusual) या बायोपिकमध्ये याविषयीची सविस्तर माहिती दिली. तिचे हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते.


स्मरणशक्तीच नव्हे तर चालणे फिरणेही झाले होते बंद...
1999 साली झालेल्या अपघातात अनूची स्मरणशक्तीच गेली होती. इतकेच नाही तर तिचे चालणे-फिरणेही बंद झाले होते. 29 दिवस अनू कोमात होती. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा ती आपली भाषासुद्धा विसरली होती. शरीराचा खालचा भाग पॅरालाइज्ड झाला होता. मात्र योग्य उपचारांमुळे ती हळूहळू बरी झाली. मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने तिने पुन्हा इंग्रजी आणि हिंदी भाषा अवगत केली.


सर्वात यशस्वी सिनेमा ठरला होता 'आशिकी'...
47 वर्षीय अनूने आपल्या करिअरमध्ये जवळजवळ डझनभर सिनेमांमध्ये कामे केली. मात्र 'आशिकी' हा तिच्या करिअरमधील सर्वात हिट ठरलेला सिनेमा आहे. दीर्घकाळ मीडियापासून दूर राहिलेली अनू आता सोशल मीडियावर अॅक्टिव असून बिहारच्या मुंगेर येथे ती मुलांना योगा शिकवण्याचे काम करते.


लूकमध्ये आला बराच बदल...
अनूचा चेहरा पूर्वीच्या तुलनेत बराच बदलेला आहे. मात्र वाढत्या वयाने लूकमध्ये बदल झालेली अनू इंडस्ट्रीतील एकमेव अभिनेत्री नाहीये. तिच्या समवयीन अभिनेत्रीसुद्धा काळानुरुप ब-याच बदलल्या आहेत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नव्वदच्या दशकातील अभिनेत्रींचा लेटेस्ट लूक...

Next Article

Recommended