Home »Gossip» 90s Missing Actress Farheen Working As Business Women In Delhi

बॉलिवूडमधून अचानक निघून गेली होती 90's ची ही प्रसिद्ध अभिनेत्री, आता करते हे काम

दिव्य मराठी वेब टीम | Feb 08, 2018, 11:01 AM IST

मुंबईः 90 च्या दशकातील गाजलेल्या 'जान तेरे नाम' या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री फरहीन दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. फरहीन दिल्लीत पती आणि माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर राहते.


'जान तेरे नाम' या चित्रपटानंतर फरहीन 1994 साली आलेला चित्रपट 'नजर के सामने'मध्ये अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली होती. विशेष म्हणजे यापूर्वी ती अक्षय कुमार स्टारर 'सैनिक' या चित्रपटात त्याच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. 1997 मध्ये फरहीनने क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत गुपचुप लग्न थाटले आणि बॉलिवूडपासून सन्यांस घेतला. लग्नानंतर फरहीन नव-यासोबत दिल्लीला स्थायिक झाली.

बॉलिवूडमध्ये केला कॅमबॅक करण्याचा प्रयत्न, ठरली फ्लॉप...
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जान तेरे नाम'चे दिग्दर्शक बलराज साहनी विज यांनी याच चित्रपटाच्या सिक्वेलसाठी फरहीनला विचारणा केली होता. पण तिने आईची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. तारुण्यात आईची भूमिका करणार नसल्याचे तिने कारण पुढे केले होते.

आता बिझनेस करतेय फरहीन..
फरहीन आता यशस्वी बिझनेसवुमन आहे. दिल्लीत तिचा हर्बल स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे. नॅचरल हर्ब्स असे तिच्या कंपनीचे नाव आहे. 18 वर्षांपूर्वी नव-यासोबत फरहीनने ही कंपनी सुरु केली होती. आज या कंपनीचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात आहे.

पुढच्या स्लाईडवर वाचा, फरहीनमुळे तुटले होते मनोज प्रभाकरचे पहिले लग्न..

Next Article

Recommended