आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: सलमानचा चित्रपट 'भारत'साठी खुप मेहनत करतेय दिशा पाटनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: दिशा पाटनी आपला पुढचा चित्रपट 'भारत'साठी खुप मेहनत करतेय. दिशाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती शानदार जंप करताना दिसतेय. 'भारत' चित्रपटात दिशा ट्रॅपीज आर्टिस्टच्या भूमिकेत आहे. चित्रपटात दिशाला अनेक स्टंट्स करायचे आहेत आणि कसरती दाखवायच्या आहेत. दिशाला परफेक्ट ट्रेनिंग देण्यासाठी इंटरनॅशनल लेव्हलचा ट्रॅपीज आर्टिस्ट अलीला बोलावण्यात येणार आहे. तो 14 जुलैला दिशाला ट्रेनिंग देणे सुरु करेल. दिशाची ट्रेनिंग दोन आठवडेल चालणार आहे आणि प्रत्येक दिवशी 6 तासांचे ट्रेनिंग सेशल असतील. 'भारत' हा चित्रपट कोरियन फिल्म 'ओड टू माय फादर' चा हिंदी रीमेक आहे.


20 जुलैपासून सुरु होणार चित्रपटाची शूटिंग...
- सलमान खान आणि प्रियांका चोप्रा स्टारर 'भारत' चित्रपटाची शूटिंग 20 जुलैला सुरु होईल. चित्रपट पुढच्यावर्षी ईदच्या निमित्ताने रिलीज होईल. या चित्रपटात सलमान, प्रियांका आणि दिशा पाटनीसोबतच तब्बू, सुनील ग्रोवर आणि आसिफ शेख काम करत आहेत.
- दिशा पाटनीला साउथचा मेगा बजेट चित्रपट 'संघमित्रा'साठीही साइन केले गेले आहे. या चित्रपटातून ती साउथ इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटाची शूटिंग ऑगस्टमध्ये सुरु होईल. चित्रपटाचे डायरेक्टर सुन्दर सी आहेत. 'संघमित्रा' एक योध्दा राजकुमारीची कथा आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 350 कोटी रुपये आहे.


 

बातम्या आणखी आहेत...