आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमेशने शेअर केला हा फोटो, लोक म्हणाले हनीमूनला पालक काय खात बसला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिंगर हिमेश रेशमिया दुबईमध्ये आपली पत्नी सोनिया कपूरसोबत हनीमून एन्जॉय करुन भारतात परतला आहे. त्याने नुकताच या हॉलिडे पीरिअडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो पत्नीसोबत एका सुंदर लोकेशनवर डिनर करताना दिसतोय. कदाचित हिमेश डायटिंगवर आहे यामुळे तो येथे फक्त ग्रीन सलाद खाताना दिसतोय. काही सोशल मीडिया यूजर्सने त्याची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने लिहिले, "कच्चा पालक खातोय हिमेश रेशिमिया" तर एका यूजरने लिहिले की, "हे जेवण काय जेवण आहे का?" हिमेशने 11 मे रोजी आपल्या मुंबई येथील घरात एका प्रायव्हेट फंक्शनमध्ये सोनियासोबत लग्न केले. यामध्ये त्याने काही विशेष लोकांनाच निमंत्रण दिले होते.


10 वर्ष डेटिंगनंतर हिमेश-सोनियाने केले लग्न...
- हिमेश आणि सोनियाचे अफेअर 2006 मध्ये चर्चेत आले होते.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, हे दोघं जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लिव्ह इनमध्ये राहत होते.
- सोनिया कपूर टीव्ही अभिनेत्री आहे. ती आतापर्यंत  'किटी पार्टी', 'आ गले लग जा', 'पिया का घर', 'कभी कभी', 'कुसुम', 'सती', 'रिमिक्स', 'एस बॉस', 'कैसा ये प्यार है' सारख्या शोजमध्ये दिसली आहे.
- हिमेशने 1994 मध्ये कोमलसोबत पहिले लग्न केले होते. 2005 मध्ये हे दोघं वेगळे राहत होते. जून 2017 मध्ये 22 वर्षांनंतर यांचा घटस्फोट झाला. दोघांना एक स्वयं नावाचा मुलगा आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिमेश रेशमिया आणि सोनियाचे photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...