आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Krish 4 Speculations: Tiger Shrof Posts Transformed Body Video With Hrithik Vs Tiger Caption

#hrithikvstiger: \'Krish 4\' मध्ये हृतिक विरुद्ध टायगर? बॉडी पाहून चक्रावेल डोके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवुडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सध्या चर्चेत आहे. त्याने जबरदस्त एक्सरसाइजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये त्याच्या बायसेप्सचा आकार पाहून सगळेच हैराण आहेत. तो सध्या आपला पुढील चित्रपटासाठी बॉडी बिल्डिंग करत आहे. परंतु, त्याने या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे तो हृतिक रोशनचा प्रस्तावित सुपरहिरो चित्रपट Krish-4 ची तयारी करतो आहे की काय असा प्रश्न पडला आहे. कॅप्शनमध्ये त्याने याचे संकेत दिले आहेत. 


काय लिहिले टायगरने?
टायगरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला. त्यामध्ये तो हेवी बायसेप एक्सरसाइज करताना दिसून आला. या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले, 'सर्वात मोठ्या सुपरहिरोला टक्कर देण्यासाठी नवीन आर्मर (चिलखत) ची गरज आहे. तयारी सुरू केली आहे.' या कॅप्शनसाठी त्याने '#HrithikVsTiger' (हृतिक विरुद्ध टायगर) हे हॅशटॅग वापरले. अर्थात तो हृतिकला टक्कर देण्यासाठी इच्छुक आहे. परंतु, ही टक्कर चित्रपटात देणार की फक्त बॉडी बिल्डिंगपुरती हे स्पष्ट नाही. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये हृतिकला सुपरहिरो म्हटले आहे. हृतिकने क्रिश सिरीझमध्ये सुपरहिरोची भूमिका साकारली आहे. अशात तो पुढच्या क्रिश चित्रपटात व्हिलेनची भूमिका साकरणार अशी शक्यता दिसत आहे.


दोन चित्रपटांसाठी सज्ज टायगर...
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर सध्या रॅम्बो चित्रपटाची तयारी करत आहे. आगामी चित्रपट रॅम्बोमध्ये तो हॉलिवूड सुपर स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनपासून प्रेरित आहे. तत्पूर्वी तो करण जोहरचा चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून तो आता रॅम्बोच्या तयारीला लागला आहे. या चित्रपटात सिल्वेस्टर स्टॅलोनचा लुक मिळवण्यासाठी तो तासंतास जिममध्ये घालवत आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...