आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धडक'च्या शुटिंगदरम्यान झाला अपघात, मेकिंग Video मध्ये जान्हवी-ईशानचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा अपकमिंग 'धडक' चित्रपट 20 जुलै ला रिलीज होत आहे. रिलीजच्या पूर्वी या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर झाला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, कोलकाता कधीही निराश करत नाही. हा व्हिडिओ कोलकातामध्ये झालेल्या शुटिंग दरम्यानचा आहे. डायरेक्टर शशांक खेतान यांनी कोलकात्यात शूट कसे झाले ते सांगितले. तर ईशान आणि जान्हवी यांनी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या एका अपघाताबाबत सांगितले. या अपघातामुळे शुटिंगमध्ये बदल करावा लागला असेही त्यांनी सांगितले. मेकिंग व्हिडिओमध्ये ईशान-जान्हवी मस्ती करतानाही दिसत आहे. दोघेही 'धडक'द्वारे बॉलिवूड डेब्यू करत आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट मराठी 'सैराट'चा रिमेक आहे. 

बातम्या आणखी आहेत...