आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी कॅसेट विकून उदरनिर्वाह करायचा हा तरुण, हीरोसारखा चेहरा नसताना आहे सुपरस्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका (बांगलादेश)- गेल्या काही दिवसांपासून एक हिरोची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरु आहे. पण भारतात या हिरोला कुणीही ओळखत नाही. दुसरीकडे बांगलादेशातील प्रत्येक व्यक्ती त्याला ओळखते. एवढेच नव्हे तर त्याला सुपरस्टारही म्हटले जाते. बांगलादेश मॉडेल आणि अॅक्टर आलम उर्फ अलोम बोगरा असे या हिरोचे नाव आहे. बांगलादेशात तो एवढा प्रसिद्ध आहे, की फॅन्सच्या त्याच्या नावे फेसबुकवर अनेक पेजेस तयार केले आहेत.


बांगलादेशी क्रिकेटर्सही आहे अलोमचे फॅन्स
- मीरपूरमधील शेर-ए-बंगला स्टेडियममध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी बांगलादेशी टीम प्रॅक्टीस करत होती. यावेळी अलोम स्टेडियममध्ये आला. तेव्हा लोकांनी क्रिकेटर्सना सोडून अलोमचे फोटो घेणे पसंत केले.
- बांगलादेशी क्रिकेट टीमचे खेळाडू अलोमचे फॅन्स आहेत. तस्कीन अहमद सांगतो, की अलोम आमचा फेव्हरेट हिरो आहे. मुश्तफिकूर रहिम सांगतो, की अलोम वन अॅण्ड ओन्ली हिरो आहे.


सीडी, कॅसेट विकायचा बांगलादेशचा सुपरस्टार
- अलोमचे पूर्ण नाव अशरफुल आलम सईद असे आहे. त्याचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील चनाचूर नावाचा पदार्थ विकून कुटुंबाचा खर्च भागवायचे. अलोम 10 वर्षांचा असताना वडीलांनी त्याला आणि पत्नीला सोडून दुसरे लग्न केले.
- प्रचंड गरीब असल्याने आलोमकडे पैसे नव्हते. त्यानेही वडीलांचा बिझनेस फॉलो केला. त्यातून त्याला दोन वेळच्या जेवणाचे पैसे मिळायचे. पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. तो सातवी नापास झाला.
- त्यानंतर त्याने अभ्यास सोडून सीडी, कॅसेट विकण्यास सुरवात केली. पण त्याचा हा बिझनेस चालला नाही. त्याने केबल टीव्हीचा बिझनेस सुरु केला.
- या बिझनेसमधून त्याला दिवसाकाठी 70-80 रुपये मिळायचे. त्यातून तो खर्च भागवत होता. या उत्पन्नात तो खुश होता.
- अलोमच्या फॅमिलीत आता पत्नी सूमी अख्तर आणि मुलगा अबीर, मुलगी अलो हे आहेत. त्याला चांगला स्वयंपाक करता येतो.


पुढील स्लाईडवर वाचा, बांगलादेशी सुपरस्टार अलोम दोन महिने राहणार अमेरिकेत... असा सुरु झाला अभिनयाचा प्रवास.... 

बातम्या आणखी आहेत...