आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक वादविवादांनंतर अखेर ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येतोय. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे टीझर प्रदर्शित केले आहेत. त्याचसोबत ‘घुमर’ गाण्याचे नवे व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘घुमर’च्या या नव्या व्हर्जनमध्ये दीपिका पदुकोणची कंबर झाकण्यात आली आहे. ‘पद्मावत’ प्रदर्शित करण्यापूर्वी त्यात पाच बदल करण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले होते. यात ‘घुमर’ गाण्यातील बदलाचाही समावेश होता. गाण्यात सीजीआयच्या माध्यमातून बदल करत दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे.
चित्रपटात राणी पद्मावतीला अशा पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे करणी सेनेसोबतच जयपूरमधील शाही कुटुंबाने विरोध दर्शवला होता. ‘घुमर’ गाण्यात ज्याठिकाणी दीपिकाच्या कमरेचा भाग दिसत असेल ती दृश्यं काढू टाकण्यात यावीत असे आदेश सेन्सॉरने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिले होते. मात्र, गाण्यातील दृश्यांना कात्री लावल्यास गाण्याचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शनच बिघडले असते. त्यामुळे ग्राफिक्सच्या माध्यमातून दीपिकाची कंबर झाकण्याचा मार्ग दिग्दर्शकाने निवडला.
दीपिकावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे नवीन व्हर्जन रिलीज झाल्यानंतर ट्विटरवर त्याची खिल्ली उडवली जातेय. ट्विटरवर काही या गाण्यावर काही गमतीशीर व्हिडिओज नेटकरांनी पोस्ट केले आहेत.
पुढील स्लाईड्सवर बघा, कशी उडवली जातेय दीपिकावर चित्रीत झालेल्या 'घुमर...' या गाण्याची खिल्ली आणि सोबतच या गाण्याचे जुने आणि नवीन व्हर्जन...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.