आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफेअरच्या चर्चा सुरु असताना रात्री उशिरा आलियाच्या घरी पोहोचला रणबीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर सध्या दोन गोष्टींमुळे सर्वात जास्त चर्चेत आहे. एक म्हणजे त्याचा 'संजू' चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिसवर आपला बोलबाला कायम ठेवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलिया भट्टसोबत अफेअर. अफेअरची चर्चा चालू असतानाच पुन्हा एकदा रणबीर आलियासोबत दिसला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा रणबीर आलियाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. याठिकाणी तो आलियाचे वडील महेश भट्ट यांनाही भेटला. या तिघांचे काही फोटो समोर आले आहेत.


'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर भेटले होते दोघे
रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा समोर येत आहेत. आलिया मीडियासमोर रणबीरसोबत असलेल्या रिलेशनविषयी जास्त बोलत नाही परंतु रणबीर या प्रकरणावर काही प्रतिक्रिया देतो. नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या या रिलेशनविषयी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले होते की, 'मी सिंगल नाही, मी कधी सिंगल राहूच शकत नाही.' त्यानंतर त्याला आलियाला सध्या डेट करत आहेस का असे विचारल्यानंतर रणबीरने सांगितले की, 'मी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 'राझी' नाही.


पुढील स्लाईड्सवर पाहा, आलिया, रणबीर आणि महेश भट्ट यांचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...