आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wrap Up पार्टीमध्ये सैफच्या मुलीने अॅक्टरला मारली मिठी, Video व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूतच्या 'केदारनाथ' चित्रपटाची शुटिंग पुर्ण झाली आहे. मुंबईमध्ये चित्रपटाचे रॅपअप सेलिब्रेट केले आहे. शूटिंग सेटवरील पार्टीमध्ये सुशांत सिंह राजपूतने केक कापला. या रॅपअप पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत, साराला केक खाऊन मिठी मारताना दिसतोय. यासोबतच सुशांतला चित्रपटाचे डायरेक्टर अभिषेक कपूर शूटिंग पुर्ण होण्याच्या शुभेच्छा देत आहे. डायरेक्टर अभिषेकने शूटिंग संपल्यानंतर सुशांतसोबत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. सारा अली खानचा डेब्यू चित्रपट 'केदारनाथ' याचवर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच सारा अॅक्टर रणवीर सिंहसोबत 'सिम्बा' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सारा लवकरच मुंबईतून हैदराबादला रवाना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...