आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी- ईशानचा व्हिडिओ होतोय Viral, हे आहे व्हिडिओमागचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवी कपूर शूटिंगवर परतली असून तिने तिच्या आगामी 'धडक' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जान्हवी तिचा को-स्टार ईशान खट्टरसोबत दिसत आहे. पण या व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचे सत्य तुम्हाला ठाऊक आहे का? हा जान्हवीचा लेटेस्ट व्हिडिओ नसून चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या शेड्यूलचा आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल काही महिन्यांपूर्वी झाले होते. त्यावेळी श्रीदेवी हयात होत्या.  

 

मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे जान्हवी... 
जान्हवी आणि ईशानचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ ईशान खट्टर टीमच्या इंस्टाग्रामवर अलीकडेच शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शन देण्यात आले, '#tbt @ishaan95 and @janhvikapoor on the sets of #Dhadak😍❤ #ishaankhatter#janhvikapoor alicool000😎'. या व्हिडिओत जान्हनी मस्तीच्या मूडमध्ये दिसतेय. पिवळ्या रंगाचा सलवार सूट तिने परिधान केला आहे. ईशानसोबत ती गप्पा मारताना दिसतेय. 

 

आईच्या निधनाच्या 13 दिवसांनी शूटिंगवर परतली जान्हवी... 
आईच्या निधनानंतर 13 दिवस कुटुंबीयांसोबत जान्हवी राहिली. त्यानंतर 8 मार्च रोजी ती 'धडक'च्या शूटिंगवर परतली. 'धडक'चे दिग्दर्शक  शशांक खैतान यांनी सांगितले, की आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. टीमने ब्रेक घेतल्याच्या बातम्या अफवा आहेत. आम्ही मुंबईत शूटिंग सुरु केले असून पुढचे शेड्युल हे कोलकाता येथे आहे. जान्हवी आणि ईशान यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रा परिसरात चित्रपटाच्या काही सीन्सचे शूटिंग केले. आता जान्हवी पुढील शेड्युलसाठी चित्रपटाच्या टीमसोबत कोलकाता येथे रवाना होणार आहेत. धडक हा मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाचा हिंदी रिमेक असून करण जोहर याचा निर्माता आहे. यावर्षी 6 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, जान्हवी आणि ईशान यांचे निवडक फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...