आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले नजरेने केले घायाळ, आता म्हणतेय, मेरे सईयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नजरेने घायाळ करणारी तरुणी म्हणून  इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या प्रिया प्रकाश या नवोदित अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. प्रियाचा हा डब-स्मॅश व्हडिओ असून तिने खास व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तो पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती तिच्या एका मैत्रिणीसोबत ब्रेकअप साँगवर किलर एक्सप्रेशन्स देताना दिसतेय. 

 

- या नवीन व्हिडिओत प्रियाने, "मेरे सईयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया..." या गाण्याचा डबस्मॅश केले आहे.
- व्हिडिओत शालेय गणवेशात प्रिया दिसत असून तिच्यासोबत तिची एक मैत्रीणदेखील दिसतेय.

 

सिंगल आहे प्रिया
- 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणा-या प्रियाने एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती अद्याप सिंगल असल्याचे सांगितले.
- 18 वर्षीय प्रिया बी कॉम फर्स्ट ईयरची विद्यार्थीनी असून आज (14 फेब्रुवारी) ही तिने महाविद्यालयात हजेरी लावली आहे.
- प्रियाने सांगितले, की हजेरी कमी असल्याने तिने आज कॉलेजमध्ये वर्गात हजेरी लावली. येथून तिने हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला.


पुढील स्लाईड्सवर बघा, प्रिया प्रकाश वारियरचे किलर एक्सप्रेशन असलेले निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...