आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा जान्हवी कपूरने दिला शाहरुख खानला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या 'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. ट्रेलर पाहून बॉलिवूड सेलेब्सने जान्हवी आणि ईशान खट्टरची खुप स्तुती केली आहे. ट्रेलरच्या चर्चेच्या काळातच जान्हवीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर शाहरुख खानला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड देताना दिसतेय. शाहरुखला देवदास चित्रपटासाठी हा अवॉर्ड मिळाला होता. व्हिडिओमध्ये जान्हवी पापा बोनी कपूर आणि प्रिती झिंटासोबत आहे. हा व्हिडिओ खुप जुना आहे. कारण यामध्ये जान्हवीचे वय 8 ते 10 वर्षे आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहू शकतो की, बोनी जान्हवीला कडेवर घेऊन प्रितीसोबत शाहरुख खानला बेस्ट अॅक्टर अवॉर्ड देण्यासाठी बोलावत आहेत. स्टेजवर पोहोचताच शाहरुख सर्वात पहिले जान्हवीला भेटतात. हा व्हिडिओ जान्हवी-खुशी फॅन क्लबने शेअर केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...