आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Actress Gracy Singh Left Acting And Became Spiritual: Gracy Did B Grade Films And For Money Run Dance Academy

Acting सोडून आध्यात्माच्या मार्गावर निघाली आमिरची हिरोइन ग्रेसी, आहे अविवाहित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आमिर खानची हिरोइन म्हणजेच 'लगान: वंस अपॉन ए टाइम इन इंडिया' मध्ये काम केलेली ग्रेसी सिंह आता अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे. तिने 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केलेले आहे. ग्रेसी आता आध्यात्माशी जोडली गेली आहे. तिने आध्यात्मिक संस्थाम ब्रम्हकुमारीज जॉइन केले आहे. ब्रम्हकुमारीजचे हेडक्वार्टर माउंटआबूमध्ये आहे. ग्रेसी दिर्घकाळापासून येथे नियमित जात आहे. 37 वर्षांची ग्रेसी अविवाहित आहे. तिने एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना सांगितले होते की, माझा स्वतःचा काही प्लान नाही. घरातील लोक लग्नाविषयी बोलतात, परंतू मी याविषयी अजून विचार केलेला नाही.


B-ग्रेड चित्रपटात केले काम, तर कधी चालवले डान्स क्लास
- ग्रेसीने 1997 मध्ये 'अमानत' या टीव्ही शोमधून अभिनयाला सुरुवात केली. काही काळानंतरच तिला चित्रपटाच्या ऑफर मिळू लागल्या. 'हम आपके दिल में रहते हें' नंतर तिने आमिर खानसोबत 'लगान' चित्रपटात काम केले. यानंतर ग्रेसीचे करिअर उंचावले. 
- ग्रेसीने अजय देवगनसोबत 'गंगाजल'(2003) मध्ये काम केले. परंतू तिची भूमिका छोटेखानी असल्यामुळे तिला नुकसान झाले. यानंतर तिने 'मुन्नाभाई MBBS' (2004) मध्ये काम केले. परंतू यामुळे तिला काहीच फायदा झाला नाही. यामुळे तिने तेलुगु, पंजाबी, गुजराती, मल्याळम, कन्नड, मराठीसारख्या भाषांमधील चित्रपटात काम केले. परंतू तरीही तिला यश मिळाले नाही.
- एक काळ आला त्यानंतर ग्रेसीला चित्रपट मिळणे बंद झाले. मग तिने B-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणे सुरु केले. एवढेच नाही तर ती सिल्वर स्क्रीनवरुन टीव्हीवर आली. तिने 'संतोषी मां' मालिकेत काम केले.
- टीव्हीवर आल्यानंतर ग्रेसीने 2009 मध्ये डान्स अकॅडमी सुरु केली होती. येथे ती स्वतः डान्स शिकवायची.


पालकांची इच्छा होती, ग्रेसीने इंजीनियर बनावे
- ग्रेसीचा जन्म 20 जुलै 1980 मध्ये नवी दिल्लीमध्ये झाला होता. तिचे वडील स्वर्ण सिंह आणि आई वरजिंदर सिंहची इच्छा होती की, तिने इंजीनियर बनावे.
- ग्रेसीने अभ्यास केला, परंतू ती मॉडलिंगमध्ये आली. क्लासिकल डान्स (भरतनाट्यम आणि ओडिसी) मध्ये ट्रेंड असलेल्या ग्रेसीने यानंतर टीव्ही सीरियल आणि चित्रपटांत काम केले.

 

बातम्या आणखी आहेत...