आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञातवासात आयुष्य जगतोय आमिरचा हा भाऊ, बॉलिवूड सोडून राहतो आता पहाडांमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज (14 मार्च) 53 वर्षांचा झाला आहे. 1985 मध्ये 'होली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या आमिरचा पहिला सुपरहिट चित्रपट होता  'कयामत से कयामत तक'. या चित्रपटातून आमिर खान एका रात्रीत सुपरस्टार बनला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक आमिरचा चुलत भाऊ मन्सूर खान होते. 1988 मध्ये कयामत से कयामत तक या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली आणि 2008 मध्ये निर्माता म्हणून त्यांनी पहिला आणि शेवटचा चित्रपट जाने तू या जाने ना हा बनवला. पण आता मन्सूर खान चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. 

 

साउथ इंडियामध्ये बिझनेस करतात मन्सूर... 
- मन्सूर खान हे जवळजवळ 15 वर्षांपासून तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील कुनूर भागात वास्तव्याला आहेत. ते आता चीज  बनवण्याचा व्यवसाय करतात.
- परंतू चीजच्या व्यवसायासाठी मन्सूर यांनी चित्रपटसृष्टी का सोडली? या प्रश्नाचे उत्तर एका मुलाखती दरम्याने त्यांनी दिले होते. मन्सूर यांनी सांगितले, "हा निर्णय मी अचानक घेतलेला नाही. मला लहानपणापासूनच बिझनेस करायचा होता."
- मन्सूरने म्हणाले, "पनवेल (मुंबईनजीक) आमची काही जमीन होती. त्या जमीनीशी आम्ही खुप जोडले गेलो होतो. मी आणि माझी बहीण तिथे जायचो आणि स्वतः भेंडीचे झाडे लावायचो. मी अब्रॉडहून कोर्नेल आणि MIT पर्यंत गेलो, परंतू आतून आनंदी नव्हतो."
- "वडिलांनी (नासिर हुसैन) यांनी चित्रपटांमध्ये येण्याचा सल्ला दिला. तेव्हाही माझा प्रमुख उद्देश होता की, जमीनीशी जोडलेले राहावे. जोपर्यंत मला हवे तसे आयुष्य मिळत नव्हते, तोपर्यंत चित्रपट करत होतो."
- "1979 ते 1980 पर्यंत मी कॉर्नेल आणि MIT मध्ये राहिलो आणि नंतर MIT चे शेवटचे वर्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अलीबागजवळ काही जमीन होती. सरकारला त्या जमीनीवर अधिग्रहण करुन एयरपोर्ट बनवायचे होते. त्यावेळी मला भूमिअधिग्रहण आणि याच्या अधिकारांविषयी माहिती मिळाली."


पुढील स्लाइडवर क्लिक वाचा, मन्सूर यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही खास गोष्टी... 

बातम्या आणखी आहेत...