आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: आमिरने पत्नी किरणला Kiss करुन साजरा केला वाढदिवस, मीडियासोबत कापला केक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता आमिर खानने आज वयाच्या 54 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आमिर आज दुपारी खास जोधपूरहून मुंबईत दाखल झाला.  विशेष म्हणजे आमिरची पत्नी किरण राव हिने मुंबई विमानतळावर जाऊन त्याला सरप्राइज दिले. आमिर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने जोधपूर येथे होता. आज तो जोधपूरहून मुंबईत दाखल झाला. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याने सर्वप्रथम मीडियासोबत केक कापून  बर्थडे सेलिब्रेशन केले सोबतच मीडियाच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरेही दिली. 

 

विमानतळावर कैद झाले आमिरचे पत्नीसोबतचे लव्ही-डव्ही मोमेंट्स ...

आमिर दुपारी बाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाला. यावेळी त्याची पत्नी किरण राव त्याला घ्यायला विमानतळावर पोहोचली होती. किरणचे हे सरप्राइज बघून आमिर खूप खुश झाला. त्याने तिला मिठी मारली आणि तिला किस केले. त्यानंतर आमिरने घरी पोहोचून दरवर्षीप्रमाणे मीडियासोबत सेलिब्रेशन केले. केक कापल्यानंतर आमिरने पुन्हा एकदा पत्नी किरणला किस केले. या दोघांचे हे लव्ही डव्ही मोमेंट्स मीडियाच्या कॅमे-यात कैद झाले. 

 

कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करत असल्याचा आनंद...
खरं तर आमिर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने जोधपूर येथे होता. पण वाढदिवशी तो मुंबईत परतला. याविषयी तो म्हणाला, "मी माझ्या दिग्दर्शकाचे आभार मानतो, त्याने मला दोन दिवसांची सुटी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाचाही माझा वाढदिवस मुलगा आझाद, पत्नी किरण आणि आईसोबत साजरा होत असल्याचा मला आनंद आहे." 

 

आई आणि किरणचे केले कौतुक... 
आज मी जो काही आहे, तो केवळ माझ्या आईमुळेच आहे, असे आमिर यावेळी सांगितले. तर पत्नी किरण आयुष्यात आल्याने नवी ऊर्जा मिळाल्याचेही तो म्हणाला.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, मीडियासोबत सेलिब्रेशन करताना क्लिक झालेले आमिर-किरणचे लव्ही-डव्ही मोमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...