आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करण्यास आमिरने दिला होता नकार, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' 29 जूनला रिलीज होत आहे. चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्तचे वडील म्हणजेच सुनील दत्तची भूमिका परेश रावल साकारत आहे. डायरेक्टर राजू हिरानीने सुनील दत्तचे कॅरेक्टर परेश रावलपुर्वी आमिर खानला ऑफर केले होते. परंतू आमिरने ही भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला होता.


या कारणांमुळे दिला होता नकार
राजकुमार हिराणी यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, - 'आमिर माझा चांगला मित्र आहे आणि मी आजही स्क्रिप्ट लिहिल्यावर त्यांना दाखवतो. मी त्यांना 'संजू'ची कथा ऐकवली तर ते म्हणाले की, मी सुध्दा यामध्ये काही तरी करु शकतो. यावर मी आमिरला सुनील दत्तची भूमिका साकारण्यासाठी सांगितले. परंतू 'दंगल' मध्ये त्यांनी एका वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारली होती. यामुळे त्यांनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला. 

 

संजू चित्रपटात नरगिसची भूमिका मनीषा कोइराला, संजय दत्तची पत्नी मान्यताची भूमिका दीया मिर्जा, माधुरी दीक्षितची भूमिका करिश्मा तन्ना आणि टीना मुनीनच्या भूमिकेत सोनम कपूर दिसणार आहे. तर सलमानचा मेहूणा कुमार गौरवच्या भूमिकेत विक्की कौशल आणि सलमानच्या भूमिकेत जिम सर्भ दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या 'संजू' चित्रपटात कोण कोणती भूमिका साकारत आहे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...