आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असा दिसतो 'आशिकी' फेम हा अॅक्टर, या कारणामुळे पत्नीने काढले होते घराबाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 'आशिकी', 'सडक', 'खिलाडी' यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता दीपक तिजोरी दीर्घ काळापासून अभिनयापासून दूर आहे. अलीकडेच त्याने दिवंगत अभिनेते नीरज वोरा यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. ब-याच काळानंतर कॅमे-यासमोर आलेल्या दीपकला यावेळी क्षणभर ओळखणे कठीण झाले होते. अतिशय बदलेल्या लूकमध्ये तो यावेळी दिसला. वाढलेल्या दाढीमिशा आणि वजनामुळे हा दीपक तिजोरीच आहे, हे ओळखणे कठीण झाले होते.


पत्नीपासून वेगळा राहतो दीपक....  
- दीपिक तिजोरी आणि त्याची पत्नी शिवानी तनेजा यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दीपक पत्नी आणि मुलीपासून दूर राहतोय. त्याच्या पत्नीनेच त्याला घराबाहेर काढले आहे. 
- इतकेच नाही तर पत्नी शिवानीने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली आहे. 
- शिवानीने त्यांची मुलगी समारासाठी दर महिन्याला 1 लाख रुपये मागितले आहेत. शिवानीने मुलीचा खर्च करण्यास सक्षम नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळे आता ती दीपककडून पैसे मागत आहे. 
- शिवानीच्या म्हणण्यानुसार, मुलगी समारा जोपर्यंत 20 वर्षाची होत नाही तोपर्यंत तिच्या पालनपोषणासाठी दीपकने दरमहिना 1 लाख रुपये द्यावे. 
- हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. दीपकने एवढे पैसे देऊ शकत नसल्याचे त्याच्या अपीलमध्ये म्हटले आहे. आता कोर्टाच्या निर्णयाकडे दोघांचेही लक्ष लागले आहे. 

 

दीपकच्या एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरमुळे पत्नीने काढले घराबाहेर...
- काही महिन्यांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, दीपकला त्याच्या पत्नीने घराबाहेर काढले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दीपिक एका मित्रासोबत पीजी म्हणून राहत आहे. तर पत्नी शिवानी गोरेगाव येथील 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. 
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीला दीपकचे त्याच्या योगा ट्रेनरसोबत अफेअर असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे तिने दीपकला घराबाहेर हाकलले.
- शिवानीने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात दीपकविरुद्ध घटस्फोटाची केस दाखल केली आहे. 

 

दीपक आणि शिवानीचे लग्न आहे बेकायदेशीर...
- या भांडणादरम्यान शिवानी आणि दीपकचे लग्न बेकायदेशीर असल्याचेही समोर आले आहे.
- दीपकचे हे पहिले तर शिवानीचे हे दुसरे लग्न आहे. विशेष म्हणजे, शिवानीने पहिल्या पतीला घटस्फोट न देता दीपकसोबत दुसरे लग्न केले होते. त्यामुळे त्यांचे हे लग्न बेकायदेशीर आहे.
- दीपकला शिवानीच्या पहिल्या लग्नाची कल्पना नव्हती. 
- दीपक आणि शिवानी यांना समारा आणि करण ही दोन मुले आहेत.  


पुढील स्लाईड्सवर बघा, दीपक तिजोरीच्या कुटुंबियांची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...