आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टरचे आईसोबतच अफेअर असल्याची पसरली होती बातमी, 3 वेळा झाला होता हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आशिकी’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता राहुल रॉय आता सिनेसृष्टीत पुनरागमनची तयारी करत आहे. आगामी 'वेलकम टू रशिया' या चित्रपटात राहुल एका पोलिस अधिका-याच्या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. नितिन गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 1990 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी' या चित्रपटातून राहुलला लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली होती. पण सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या राहुलला चित्रपटाच्या यशाचा फारसा फायदा झाला नाही. 2007 मध्ये बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तो थोडा लाइमलाइटमध्ये आला खरा, पण लवकरच तो पुन्हा पडद्यामागे निघून गेला.

 

2007 मध्ये राहुल 9 वर्षांसाठी ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये कमबॅकचा प्रयत्न केला. 'टू बी और नॉट टू बी' या 2015 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात त्याने काम केले होते. पण तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यश्सवी झाला नाही. काही महिन्यांपू्रवीच राहुलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते विजय गोयल यांच्या उपस्थितीत राहुलने भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. 

 

जेव्हा मीडियाने आईसोबतच अफेयर असल्याच्या बातम्या केल्या होत्या प्रकाशित..
राहुल रॉयला त्याच्या आयुष्यात एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. याविषयीचा खुलासा स्वतः त्याने Dainikbhaskar.com ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. राहुलने सांगितले होते, "एकदा मी बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलो. तेथी माझी आई आली. माझी आई खुप सुंदर होती. तीसुध्दा तिच्या मित्रांसोबत तेथे आली. तिने मला तिथे पाहिले तर म्हणाली की, आपण सोबत डान्स करु आणि पुढच्या दिवशी मीडियाने अशी बातमी छापली. वृत्तपत्रात बातमी आली की, राहुल राय एका वयस्कर महिलेसोबत डान्स करताना दिसला आणि या महिलेसोबत त्याचे अफेयर आहे." राहुल पुढे म्हणाला, की वृत्तपत्रांनी एकदा मला विचारायला पाहिजे होते, की ती महिला माझी कोण होती.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, गॉसिपमुळे झाला तीन वेळा हल्ला... यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...