आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने शोधलेल्या 'लडकी'सोबत आयुष शर्माची झाली Look टेस्ट, रोमँटिक अंदाजात दिसले दोघे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या ‘मुझे लडकी मिल गयी’ या ट्वीटने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. अतिशय हटके पद्धतीने सलमानने त्याच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात झळकणा-या नवोदित अभिनेत्रीला जगासमोर आणले. खरं तर सलमान खानच्या ट्वीटनंतर त्याला लग्नासाठीच मुलगी मिळाली की काय, अशी चर्चा रंगली होती. पण या ट्वीटनंतर सलमानने सस्पेन्स उघड केला आणि ही त्याला गवसलेली ही 'लडकी' म्हणजे आगमी चित्रपट ‘लव्हरात्री’या चित्रपटातील हीरोईन असल्याचे उघड झाले. या अभिनेत्रीचे नाव वरिना हुसैन आहे. सलमानची धाकटी बहीण अर्पिताचा पती आयुष शर्मा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. 

 

समोर आला लूक टेस्टचा फोटो...

नुकताच आयुष आणि वरिनाचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो चित्रपटातील दोघांच्या लूक टेस्टचा असून दोघांचा अतिशय रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत दोघेही व्हाइट टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहेत. वरिनाच्या चेह-यावरील हास्य बघणा-यांना घायाळ करणारे आहे.  

 

डेअरी मिल्कच्या जाहिरातीत झळकली होती वरिना..  
गेल्यावर्षी वरिना कॅडबरी डेरी मिल्कच्या एका जाहिरातीत दिसली होती. वर्षभरातच तिला सलमानच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. वरिनाने न्यूयॉर्क फिल्म अॅकाडमीमधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा, वरिनाचे घायाळ करणारे सौंदर्य खास छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...