आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्यासाठी अभिषेकने या अभिनेत्रीला दिला होता प्रेमात दगा, 10 महिने सुरु होते अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपनिता शर्मा, अभिषेक बच्चन - Divya Marathi
दीपनिता शर्मा, अभिषेक बच्चन

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत जन्मलेल्या अभिषेकची माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन पत्नी असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण ऐश्वर्यापूर्वी अभिषेक एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? असे म्हटले जाते, की ऐश्वर्यासाठी अभिषेकने या अभिनेत्रीला प्रेमात दगा दिला होता. आम्ही बोलतोय ते मॉडेल आणि अभिनेत्री दीपनिता शर्मा हिच्याविषयी. 


सोनाली बेंद्रेमुळे झाली होती अभिषेक आणि दीपनिता यांची मैत्री
- सुमित जोशी यांच्या 'अफेयर्स ऑफ बॉलिवूड स्टार्स रिवील्ड' या पुस्तकात अभिषेक आणि दीपनिता यांच्या प्रेमाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामधील उल्लेखानुसार, दीपानिताची क्लोज फ्रेंड सोनाली बेंद्रेने अभिषेकसोबत तिची ओळख करुन दिली होती. या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले होते.
- दीपानिता आणि अभिषेक यांचे अफेअर केवळ 10 महिने टिकले. त्यानंतर दोघे वेगळे झाले ते कायमचेच.
अभिषेककडून झाली होती नात्याची सुरुवात..
- रिपोर्ट्सनुसार, अभिषेकने दीपनिताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. सतत दोन महिने तो दीपनिताला कॉल करुन भेटण्याची विनंती करत होता. दीपनिता अभिषेकच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लूक्सवर भाळली होती. 
- आसामच्या एका फ्रिडम फायटर कुटुंबातून असलेल्या दीपनिताला फिल्म इंडस्ट्रीतील कुणाच्याही प्रेमात पडायचे नव्हते. पण अखेर ती अभिषेकच्या प्रेमात पडली.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अभिषेक आणि दीपानिता यांच्या नात्याविषयी आणखी बरंच काही...  

बातम्या आणखी आहेत...