आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिषेक आणि ऐश्वर्या 11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. अगदी शाही थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. बॉलिवूडपासून, क्रिकेट, राजकारण, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज या शाही लग्नसोहळ्याचे साक्षीदार झाले होते. 11 वर्षांपूर्वी लग्नगाठीत अडकणा-या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यांत प्रेमांकुर कधी फुलला, कुणी कुणाला प्रपोज केले, या गोष्टी आजही अनेकांना ठाऊक नाहीत. बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीचे औचित्य साधत आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह स्टोरी नेमकी कुठे आणि कशी सुरुवात झाली, हे सांगत आहोत.. सोबतच स्वतः अभिषेकने एका मुलाखतीत मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या किती बदलली हेदेखील सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया, बॉलिवूडच्या या क्यूट कपलची लव्ह स्टोरी...
अशी झाली होती दोघांची पहिली भेट...
ज्युनियर बच्चनची ऐश्वर्या रायसोबत पहिली प्रोफेशनल मीटिंग 1999 मध्ये एका फोटोशूटच्या वेळी झाली होती. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते, 'ऐश्वर्यासोबत माझी पहिली व्यावसायिक भेट 1991 मध्ये झाली होती. नंतर 'ढाई अक्षर प्रेम के'(2000) च्या फोटोशूटमध्ये भेटलो. हा आमचा सोबतचा पहिला चित्रपट होता. गेल्या 18 वर्षांपासून मी तिला ओळखतो, आमच्या लग्नालादेखील 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही अॅश पहिल्यासारखीच जमिनीशी जोडलेली आहे. वयाच्या 18 वर्षांतच अॅशने मॉडेलिंग आणि अॅक्टिंग करणे सुरू केले होते. याचा तिने आंनदही लुटला."
'गुरु' सिनेमाच्या प्रीमिअरनंतर अभिषेकने केले होते ऐश्वर्याला प्रपोज...
‘बंटी आणि बबली’ या चित्रपटामध्ये ‘कजरा रे’ या गाण्याच्या निमित्ताने एकत्र काम केल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याच जवळीक निर्माण झाली होती. ज्यावेळी या दोघांनीही मणिरत्नम यांच्या ‘गुरु’ सिनेमामध्ये एकत्र काम केले त्यावेळी तर अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबाबत अनेकांनाच माहित झाले होते. 'गुरु' सिनेमाच्या प्रीमिअर नंतरच अभिषेकने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती. या सिनेमाच्या रिलीजला 11 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. हा सिनेमा 12 जानेवारी 2007 रोजी रिलीज झाला होता.
गेल्यावर्षी लग्नाच्या वाढदिवसाला अभिषेक म्हणाला होता...
गेल्यावर्षी आजच्या दिवशी म्हणजे लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिषेकने त्याला ऐश्वर्याचा होकार कसा मिळाला तो किस्सा उलगडा होता. ऐश्वर्याने ज्यावेळी अभिषेकला लग्नासाठी होकार दिला होता, त्यावेळीच्या आठवणींना उजाळा देत अभिषेकने ट्विट केले होते की, ‘दहा वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या गोठवण्याऱ्या थंडीत एका बाल्कनीमध्ये तिने मला होकार दिला होता’. तो अभिषेक आणि ऐश्वर्याच्या आयुष्यातील खास क्षण होता.
पुढे वाचा, करिश्मा कपूरसोबत होणार होते अभिषेकचे लग्न...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.