आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Ashutosh Rana Interview On Upcoming Film Dhadak शूटिंगच्या पहिल्या दिवशी जान्हवीने आशुतोष राणांना विचारला होता \'हा\' प्रश्न

INTERVIEW: शूटिंगच्या पहिल्या दिवशी जान्हवीने आशुतोष राणांना विचारला होता \'हा\' प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशुतोष राणा बऱ्याच वर्षांपासून हिंदी सिनेमात दिसले नाहीत. मात्र, आता तेे बॅक टू बॅक सहा चित्रपटांत दिसणार अाहे. सुरुवात ते 'धडक'मधून करेल. यात त्यांनी जान्हवी कपूरच्या वडिलांच्या भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी झालेली ही खास बातचीत...  

 

जान्हवी आहे पोटेन्शियल अॅक्ट्रेस
श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर 'धडक' चित्रपटाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत. शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात आशुतोष राणादेखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात त्यांनी जान्हवीसोबतत काम केले. जान्हवीविषयी आशुतोष म्हणतात, 'जान्हवी एक पोटेन्शियल अॅक्ट्रेस आहे. ती भूमिकेत लवकर शिरते. शिवाय संवाद बोलताना ती हावभावावर जास्त लक्ष देते. एका चांगला कलाकार कधीच कॅमेऱ्याला पाहून गोंधळत नाही. कधीच कॅमेऱ्याच्या हालचालीवर लक्ष देत नाही, तो आपले काम करत असतो. तो नेहमी आपल्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवतो. एका उत्तम कलावंतांप्रमाणे जान्हवीदेखील तसेच करत आहे. 

 

जान्हवी आहे एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह

जान्हवीविषयी आशुतोष पुढे सांगतात, जान्हवीमध्ये मला आणखी एक गोष्ट चांगली वाटली. ती तब्बूप्रमाणेच भूमिकेला गांभीर्याने घेते. पडद्यावर दीर्घकाळ टिकण्याचा गुण मला जान्हवीमध्ये दिसला. शिवाय ती मला फारच एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाटली. हा तिचा एक चांगला गुण आहे. सेटवरदेखील ती सर्वांशी मिळून-मिसळून राहते. 


पुढे वाचा,  शुटिंगच्या पहिल्या दिवशी जान्हवीने विचारलेला पहिला प्रश्न... यासह बरंच काही... 

 

बातम्या आणखी आहेत...