आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधीच बाप झाला हा अॅक्टर, मुलीच्या जन्माच्या दोन वर्षांनी ब्रिटिश गर्लफ्रेंडसोबत थाटले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूरब कोहली आणि लूसी पेटॉन यांचे लग्नातील छायाचित्र - Divya Marathi
पूरब कोहली आणि लूसी पेटॉन यांचे लग्नातील छायाचित्र

मुंबईः 'आवारापन' (2007), 'शादी के साइड इफेक्ट' (2014) आणि 'नूर'(2017) या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता पूरब कोहली अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. 16 फेब्रुवारी 2018 रोजी पूरबने गोव्यात त्याची ब्रिटिश गर्लफ्रेंड लूसी पेटॉनसोबत गुपचुप लग्न थाटले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पूरब आणि लुसी दोन वर्षांपूर्वी एका मुलीचे आईवडील झाले आहेत. लग्नापूर्वी या दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. पूरबची जवळची मैत्रीण अमृता पुरी हिने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटोज शेअर करुन लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. 

 

पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते पूरब-लूसी

- पूरब आणि लूसीची पहिली भेट 2012 मध्ये झाली होती. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघे भेटले होते. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.
- लूसी एक योग आणि मेडिटेशन टीचर आहे.
- त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.

 

पूरबचे दुसरे लग्न...
- पूरब कोहलीचे हे दुसरे लग्न आहे.  2007 मध्ये त्याचे पहिले लग्न यामिनी नामजोशीसोबत झाले होते. मात्र तीन वर्षांतच दोघांमधील मतभेद वाढले.
- अखेर 2010 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ते कायदेशीररित्या वेगळे झाले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, पूरब कोहलीच्या लग्नाचे आणि काही इतर फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...