आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day पासून मॅरेज अॅनिव्हर्सरीपर्यंत Wife वर अशी स्तुतीसुमने उधळतो हा अॅक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Actor Ravi Dubey Birthday Special Story - Divya Marathi
Actor Ravi Dubey Birthday Special Story

मुंबई/गोरखपूर - टीव्ही अॅक्टर रवी दुबे 23 डिसेंबरला त्याचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. रवी उत्तर प्रदेशमधील देवरियाचा रहिवासी आहे. सोशल मीडियावर रवी अॅक्टिव्ह असतो. त्याची पत्नी सरगुन मेहतासोबतचे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करुन चर्चेत राहातो. 7 डिसेंबरला त्याने त्याच्या लग्नाच्या चौथ्या वाढिदवसानिमित्त वाइफ सरगुनसोबतचा फोटो पोस्ट करत तिच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. 

 

... अजून 96 वर्षे बाकी आहे 
- मॅरेज अॅनिवर्सरीच्या निमित्ताने रवीने ट्विट केले होते, 'सरगुन तु माझ्या आयुष्यात येऊन माझे जीवनच बदलून टाकले आहे. अवघ्या चार वर्षात तु मला रंकाचा राव करुन टाकले आहे. आणि विशेष म्हणजे अजून फक्त 4 वर्षे झाली आहेत अजून 96 वर्षे बाकी आहेत. आपल्या लग्नाच्या 4थ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

 

फेसबुक-इन्स्टाग्रामवर लिहिले- मी तुझा पुजारी 
- 6 सप्टेंबरला सरगुणचा वाढदिवस होता तेव्हा रवीने सरगुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरुन दिल्या होत्या. यावेळी रवीने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लिहिले होते- 'माझे गतजन्मीचे कर्म हे देवी-देवतांपेक्षा चांगले असले पाहिजे ज्यामुळे तु माझ्या आयुष्यात आहेस... माझा दोन वेळेस जन्म झाला आहे. एक माझ्या माता-पित्याने मला या जगात आणले आणि एक तेव्हा जेव्हा तु मला जगाकडे पाहाण्याचा नवा दृष्टीकोण दिला. माझ्या आयुष्यात तुझे स्थान फार सन्मानाचे आहे. कारण तु मला आत्मसन्मानाचा खरा अर्थ सांगितला.. तु माझ्यासोबत असली म्हणजे मी राजा असतो. सरगुन माझे अस्तित्व फक्त तुझ्यामुळे आहे. मी तुझ्यावर फक्त प्रेम करत नाही तर तुझी पुजा करतो, मी तुझा पुजारी आहे. सरगुन वाढिदवासाच्या शुभेच्छा... या जगातील सर्व सुख तुला मिळावे या शुभकामना..

 

शेअर केला किस करतानाचा फोटो... 
- रवी दुबेने वाइफसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तो सरगुणला किस करताना दिसत होता. 
- या फोटोवर त्याने लिहिले होते, 'मला माहित आहे की तुझी इच्छा होती की मी हा फोटो शेअर करावा, मात्र हा फोटो आपल्यातील मॅडनेस करेक्टली दाखवणारा आहे... भेटल्यावर नक्कीच माझ्यावर ओरड.'

 

बाप बनण्यासाठी वाइफचे करिअर खराब करु शकत नाही... 
- रवी टीव्ही अॅक्टर आहे तर सरगुन पंजाबी फिल्ममध्ये सध्या चांगले काम करत आहे. 2016 मध्ये dainikbhaskar.comला दिलेल्या मुलाखतीत रवीने सांगितले होते, की मला मुलं आवडतात, मात्र मी पिता होण्याची ही योग्य वेळ नाही. कारण सरगुन सध्या पंजाबी फिल्ममध्ये चांगले काम करत आहे. येणाऱ्या काही वर्षांसाठी ती बिझी आहे. अशा वेळी माझी इच्छा आहे की तिने तिच्या करिअरवर फोकस करावे. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुठे झाली रवी - सरगुनची भेट... 

बातम्या आणखी आहेत...