आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 49व्या वर्षी भाग्यश्रीने स्वतःला कसे ठेवले फिट, जाणून घ्या तिचा फॅशन-फिटनेस मंत्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टरटेन्मेंट डेस्कः 'मैंने प्यार किया' या सिनेमातून लाइमलाइटमध्ये आलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आता 49 वर्षांची झाली आहे. मात्र, अजूनही ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. या वयात भाग्यश्रीने स्वतःला एवढे फिट कसे काय ठेवले असावे, असा प्रश्न नक्कीच सर्वसामान्यांना पडला असावा. वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या भाग्यश्रीच्या चेह-यावर वाढत्या वयाचा परिणाम मुळीच दिसत नाही. आजही ती विशीतील तरुणींप्रमाणे दिसते. पण या वयात तिने स्वतःला कसे फिट ठेवले, यासाठी ती काय करते, याची खास माहिती आम्ही तिच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे भाग्यश्रीचा फिटनेस फंडा...   

 

Food - भाग्यश्री सांगते, माझ्यासाठी सकाळचा नाश्ता अतिशय महत्त्वाचा आहे. मी मॅटाबॉलिक ट्रेनिंगवर विश्वास ठेवते. सकाळी लवकरच उठून नियमित वर्कआऊट करते. योगासने करण्यावर माझा भर असतो. माझा नाश्ता हा प्रोटीनयुक्त असतो. तर लंचमध्ये मी हिरव्या भाज्या, डाळी, अधिक प्रमाणात दही आणि ब्राऊन राईसचा समावेश असतो. डिनरमध्ये मला आवडणा-या सर्व पदार्थांचा समावेश असतो. फक्त ते पदार्थ तयार करण्याची पद्धत वेगळी असते. डिनरमधअये सूप नक्की घेते. संध्याकाळी मला एक कप कॉफी हवीच असते. सोबतच मी चीज आणि क्रीम क्रॅकर्स, टोस्ट किंवा भेळ स्नॅक्सच्या रुपात घेते.  

 

Must Have-  हॉट चॉकलेट ब्राऊनी, आइस्क्रीम, जलेबी आणि सर्व प्रकारचे चीज.  

 

Health Drink - वर्कआऊटनंतर ज्युस घेते. आवळा शॉटसुद्धा माझ्या रुटीनमध्ये असतो.  

 

Fitness - जेव्हा शूटिंग असते. त्वेहा 20-20 मिनिटांचे वॉकिंग आणि जॉगिंग करते. शूटिंग नसताना मला कार्डिओसाठी वेळ मिळतो.  

 

Fashion - माझ्या मते, जे काही परिधान कराल, ते आत्मविश्वासाने कॅरी करा. हीच तुमच्यासाठी फॅशन बनते. जास्त एक्सपिरिमेंट करण्यापेक्षा क्लासी आणि एलिगेंट स्टाइल मला पसंत आहे. सौंदर्य वाढवण्यासाठी नेहमी हसत राहणे गरजेचे आहे. मी दिवसभरात भरपूर पाणी पिते आणि 2 ते 3  कप ग्रीन टी घेते.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, भाग्यश्रीची वर्कआऊट करतानाची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...