आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... प्रियांका चाेप्राची गर्लफ्रेंड! होय... स्वतः सांगितले 'ही' आहे गर्लफ्रेंड, बघा Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या प्रेमात पडली असून तिला लग्नाचे वेध लागल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत प्रियांका सध्या रिलेशनशिपमध्ये असून लवकरच दोघे साखरपुडा करणार असल्याचेही समजते. पण बॉयफ्रेंड असताना प्रियांकाची एक गर्लफ्रेंड असल्याचेही तुम्हाला ठाऊक आहे का... अहो स्वतः प्रियांकानेच हा खुलासा केला असून आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे अनेक फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 

प्रियांकाची गर्लफ्रेंड असल्याचे समजल्यावर नक्कीच तुम्ही अचंबित झाला असाल... पण थांबा थांबा कुठलेही तर्कवितर्क लावू नका.. प्रियांकाची गर्लफ्रेंड आहे, हे खरे आहे. पण ही गर्लफ्रेंड एखादी तरुणी नसून तिची पाळवी पेट आहे. हे पेट म्हणजे एक कुत्र्याचं मादी पिल्लू असून तिचे नाव प्रियांकाने डायना असे ठेवले आहे.

 

डायनासोबतचा एक फोटो शेअर करुन प्रियांकाने त्याला कॅप्शन दिले, "me and my girlfriend" डायनासोबत प्रियांका तिचा जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. इतकेच नाही तर शूटिंग सेटवरसुद्धा प्रियांकाला तिला सोबत घेऊन जात असते. विशेष म्हणजे प्रियांकाने डायनाचे एक इंस्टाग्राम पेजदेखील बनवले असून त्याचे नाव diariesofdiana असे असून या पेजचे तब्बल 70.5 k फॉलोअर्स आहेत. 


चला तर मग तुम्हीही बघा, प्रियांका आणि तिच्या गर्लफ्रेंडचे हे खास Photos... 

बातम्या आणखी आहेत...