आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 5 सावत्र, 1 सख्ख्या बहिणीवर जीवापाड प्रेम करते रेखा, वडिलांशी पटले नाही कधीही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दिवसांपासून रेखा कोणत्याही चित्रपटात झळकल्या नाहीत. पण त्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या इवेंटमध्ये नेहमीच दिसतात. मागील काही दिवसांत त्यांना सोनम कपूरच्या रिसेप्शन पार्टीत पाहण्यात आले होते आणि त्यांनी यावेळी रणवीर सिंहसोबत डान्सही केला. 

 

नुकतेच रेखा यांनी सोशल मीडिया साईटवर एक फोटो शेअर केला आहे   यात त्या साऊथ अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या सात मुली सोबत दिसत आहेत. रेखा जेमिनी यांचीच मुलगी आहे आणि या फोटोमध्ये रेखा यांनी कांजीवरम साडी घातली आहे. 

 

फोटोमध्ये रेखा त्यांच्या बहिणी जया श्रीधर, रेवती स्वामीनाथन, कमला सेलवराज, राधा उस्मान सैयद, नारायणी गणेशन आणि विजया चामुंडेश्वरी दिसत आहेत. जेमिनी गणेशन यांना पहिली पत्नीपासून चार मुली आहेत. त्यांची दुसरी पत्नी पुष्पावलीपासून त्यांना दोन मुली (रेखा आणि राधा) आणि तिसरी पत्नी सावित्रीपासून विजया चामुंडेश्वरी आणि एक मुलगा सतीश कुमार आहे. 

 

वडील जेमिनी गणेशन यांच्याबरोबर रेखा यांचे चांगले संबंध नव्हते पण सातही बहिणींसोबत त्यांची खूप चांगली बाँडींग आहे. सर्वच जणी एकमेकींवर फार प्रेम करतात. रेखा यांनी लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली होती आणि आईच्या जीवनाच्या अखेरच्या काळात रेखा यांनीच त्यांना सांभाळले. असे म्हणतात की रेखा यांचे त्यांच्या वडिलांशी कधी पटले नाही, जेमिनी यांनी रेखाच्या आईशी लग्नही केले नव्हते असेही म्हटले जाते. 

 

केवळ रेखाच नव्हे तर त्यांच्या सर्व बहिणीही काही कमी नाहीत. या सर्वजणी ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये भलेही नसतील पण आपापल्या क्षेत्रात यांनी चांगलेच नाव कमवले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेखा यांचे त्यांच्या बहिणीसोबतचे तसेच वडिलांसोबतचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...