आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबईः देशातील प्रसिध्द उद्योग घराण्यातील सूनांपैकी एक टीना अंबानी यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. 1975 मध्ये इंटरनॅशनल टीन प्रिन्सेस कॉन्टेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या टीना अंबानी 70-80च्या दशकात प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक होत्या. टीना लवकरच वयाची 61 वर्षे पूर्ण करणार आहेत. 11 फेब्रुवारी 1957 रोजी गुजरातमध्ये एका जैन कुटुंबात जन्मलेल्या टीना मुनीम यांचे बालपण मुंबईतच गेले. 1978 मध्ये 'देस-परदेस' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणा-या टीना यांना देवानंद यांनी सिनेसृष्टीत आणले असे म्हटले जाते.
टीना यांनी 35 हून अधिक सिनेमांत केले आहे काम...
टीना यांना लहानपणापासनूच ग्लॅमरचे आकर्षण होते. याच कारणामुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. टीना मुनीम एकेकाळी ग्लॅमरस अॅक्ट्रेस म्हणून त्यांची ओळख होती. टीना यांनी 13 वर्षांच्या करिअरमध्ये 35 पेक्षा जास्त सिनेमे केले. मात्र यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले.
1991 मध्ये झाले अनिल-टीना यांचे लग्न...
अनिल आणि टीना अंबानी यांची लव्ह स्टोरी पूर्णत: फिल्मी आहे. अनिल यांनी टीना मुनीम यांना एका विवाह समारंभात पाहिले होते. पहिल्याच नजरेत अनिल टीना यांच्या प्रेमात पडले होते. अंबानी कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. पण चार वर्षांनी विरोध मावळल्यानंतर 1991 साली हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
विवाहानंतर अशी बदलली लाईफस्टाईल...
विवाहापूर्वी टीना अतिशय ग्लॅमरस होत्या. मात्र विवाहानंतर त्या ग्लॅमरपासून दूर झाल्या आणि आता अतिशय साधेपणाने आयुष्य जगतात. टीना आणि अनिल या दाम्पत्याला दोन मुले आहेत. सध्या लाइमलाइटपासून दूर टीना बिझनेस, चॅरिटी यात कार्यरत आहेत.
असे आहे अनिल-टीना यांचे घर...
अनिल अंबानी आणि टीना यांनी त्यांच्या घराला सी विंड हे नाव दिले आहे. त्यांचे हे आलिशान घर 17 मजली आहे. घराच्या छतावरच हेलिपॅड बनवण्यात आले आहे. शिवाय घरात लायटिंगकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. घराचे सुंदर इंटेरिअर लक्ष वेधून घेते. घराच्या कलर सिलेक्शनकडे खास लक्ष दिले गेले आहे. या घरात अनिल अंबानी, टीना अंबानी आणि त्यांची दोन मुले अनमोल आणि अंशुल वास्तव्याला आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, टीना-अनिल यांच्या सी-विंडची आतील छायाचित्रे आणि सोबत वाचा, कशी होती दोघांची लव्ह स्टोरी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.