आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनानंतर 'या' सुंदर तरुणीला डेट करतोय शेखर सुमनचा मुलगा अध्ययन, Ex-gfवर लावले होते आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  अभिनेता शेखर सुमन आज त्यांचा 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सूमननेही हाल-ए-दिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला ते कळालेच नाही. दुसरा चित्रपट राज - द मिस्ट्री कंटीन्यूस या चित्रपटाने अध्ययनला ओळख मिळाली. या चित्रपटात त्याची जोडी कंगना राणावतसोबत जमली आणि काही काळानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. आता अध्ययन सुमन सध्या एका नव्या मुलीच्या प्रेमात आहे. शेअर केले फोटोज्...

 

अध्ययने त्याच्या इन्सटाग्रामवर तरुणीचा फोटो शेअर केला आहे. अध्ययच्या या नव्या गर्लफ्रेंडचे नाव आहे स्तुती शर्मा. अध्ययनने तिच्यासोबत इन्सटावर अनेक फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याने तिला अनेकदा I love u असे खुलेआम लिहीले आहे. यावरुन अध्ययन या नव्या गर्लफ्रेंडच्या चांगल्याच प्रेमात असल्याचे कळते. 

 

याअगोदर अध्ययनचे अभिनेत्री कंगना राणावतसोबत अफेअर होते. यांचा रोमान्स जेवढा चर्चेचा विषय ठरला तेवढेच त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. कंगना-हॉतिक वादात उडी मारत अध्ययनने कंगनाने त्याचावर केलेल्या सर्व गोष्टींचा पाढा वाचला होता. यात त्याने कंगनावर त्याच्या जेवणात रक्त मिसळणे, जादूटोणा, मारहाण करणे यांसारखे गंभीर आरोप लावले होते. यावर कंगनानेही समाचार घेत एका मुलाखतीत त्याने लावलेले सर्व आरोप फेटाळले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अध्ययन सुमनचे तसेच त्याच्या गर्लफ्रेंडचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...