आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून राणी मुखर्जीसाठी घर सोडून हॉटेलमध्ये राहू लागले होते आदित्य चोप्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 मे 1971 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लाइमलाइटपासून कायम दूर राहणा-या आदित्य यांनी 2014 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव आदिरा असे आहे. राणीसोबत लग्न थाटण्यापूर्वी आदित्य यांनी 2001 मध्ये त्यांची बालमैत्रीण पायल खन्नासोबत लग्न केले होते. पण 2009 मध्ये दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले होते. पायलसोबत घटस्फोट होण्याआधीपासूनच आदित्य आणि राणी यांच्या अफेअरची चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. यामुळे आदित्यचे वडील आणि दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा चिंतेत पडले होते. रिपोर्ट्सनुसार, वडिलांवर नाराज होऊन आदित्य घर सोडून हॉटेलमध्ये राहायला निघून गेले होते. 


यश चोप्रा आणि पामेल यांच्या अतिशय जवळ होती पायल...  
- आदित्यची पहिली पत्नी पायल, तिचे सासूसासरे अर्थातच पामेला आणि यश चोप्रा यांच्या अतिशय जवळची होती. 
- आदित्यने पायलपासून घटस्फोट घ्यावा, याच्या विरोधात पामेला आणि यश चोप्रा होते. पण आईवडिलांच्या विरोधात जाऊन आदित्य यांनी पहिल्या पत्नीपासून फारकत घेतली.
- मुलाच्या हट्टापुढे अखेर यश चोप्रा यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी आदित्य-राणीच्या नात्याला होकार दिला. 
-  राणीने मात्र एका मुलाखतीत सांगितले होते, की पायलपासून घटस्फोट घेतल्यानंतरच तिने आदित्यला डेट करायला सुरुवात केली होती.

 

2 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले होते आदित्य-राणी
बातम्यांनुसार, आदित्य आणि राणी लग्नापूर्वी दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. दोघांनी 2014 मध्ये इटलीत गुपचुप लग्न थाटले होते. आदित्यला लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नाही आणि  ते कधीच मीडियासमोर येत नाहीत. फिल्मी पार्टी आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये ते कधीही दिसत नाही.

 

पतीविषयी हे सांगते राणी...
आदित्यविषयी राणी म्हणते, "ते स्वतःच्याच जगात आनंदी राहतात. त्यांना आनंदी बघून मला आनंद मिळत असतो. मी आदित्यच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करते." 'संदीप और पिंकी फरार', 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान', 'शमशेरा' हे आदित्य चोप्रा यांचे आगामी चित्रपट आहेत. या तिन्ही चित्रपटांचे ते निर्माते आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, आदित्य-राणी आणि त्यांची लेक आदिराचे फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...