आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचा जावई पोहोचणार मादाम तुसादमध्ये, लंडनमध्ये लागणार मेणाचा पुतळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचा पती आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबूचा मेणाचा पुतळा आता जगप्रसिद्ध मादाम तुसाद या वॅक्स म्युझियममध्ये लागणार आहे. अलीकडेच मादाम तुसादच्या टीमने महेश बाबूची भेट घेतली. महेश बाबूने त्याचा हा आनंद ट्विट करुन चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

ट्विटमध्ये महेश बाबूने लिहिले, "Super happy to be a part of the prestigious Madame Tussauds :) :) Thanks to the team of artists for their attention to detail. Incredible!" पुतळ्यासाठी आवश्यक मोजमाप घेतनाची छायाचित्रे महेशने शेअर केली आहेत. अलीकडेच अभिनेता प्रभासचा पुतळा या वॅक्स म्युझियममध्ये लागला. तर बॉलिवूडमधून  माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि करीना कपूर या कलाकारांचे मेणाचे पुतळे लंडन येथील मादाम तुसाद संग्रहालयात उभारण्‍यात आले आहेत.

 

महेशच्या सिनेमाने मोडला 'बाहुबली'चा रेकॉर्ड... 
बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरलेल्या बाहुबली या चित्रपटाचा एक रेकॉर्ड  अभिनेता महेश बाबूने तोडला आहे. महेश बाबूची मुख्य भूमिका असलेला ‘भारत अने नेनू’ हा सिनेमा 20 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. तेलुगू भाषेतील हा सिनेमा 65 कोटी रुपये बजेटचा आहे.  आतापर्यंत 45 देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला असून, इतर भाषांमध्येही डब केला जाणार आहे. या  सिनेमाने प्रदर्शनाच्या दोनच दिवसांत कमाईत 125 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 48 तासात 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याचा मानही या सिनेमाने मिळवला आहे. महेश बाबू आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका या सिनेमात असून, भ्रष्टाचार विषय असलेला हा एक पॉलिटिकल थ्रिलर सिनेमा आहे.

 

शिरोडकर कुटुंबीयांचा जावई आहे महेश बाबू... 
महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावई आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही त्याची पत्नी आहे. नम्रताने अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केले आहे. दिवंगत अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची ती नात आहे. नम्रताची थोरली बहीण शिल्पा शिरोडकर हीदेखील एक अभिनेत्री आहे. 2005 मध्ये महेश आणि नम्रताचे लग्न झाले होते. दोघांची भेट 2000 साली 'वामसी' चित्रपटादरम्यान झाली होती. पाच वर्षे डेटींग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना गौतम कृष्णा हा एक मुलगा आणि सितारा  ही एक मुलगी आहे.


पाहुयात, महेश बाबूने शेअर केलेली छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...