आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : अभिषेक बच्चन सध्या आगामी चित्रपट 'मनमर्जियां' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये होता. नुकताच तो शेड्यूल संपवून घरी परतला आहे. अभिषेक घरी येताच त्याची मुलगी आराध्या खुप आनंदी आहे. अभिषेकला मुलीकडून एक खास गिफ्ट मिळाले आहे. या गिफ्टची माहिती अभिषेकने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
आराध्याने पापाला दिले हे गिफ्ट...
- पापा अभिषेक घरी परतताच मुलगी आराध्याने त्याला एक सरप्राइज गिफ्ट दिले. तिने एक हँड रिटन स्पेशल नोट दिलेय. यामध्ये "आय लव्ह यू पापा" असे लिहिलेय.
- ही स्पेशल नोट अभिषेकच्या ऑफिसमध्ये लावण्यात आली आहे. तो दोन महिन्यानंतर ऑफिसमध्ये पोहोचताच त्याला हे स्पेशल नोट मिळाले.
- मुलीने असे लिहिलेले पाहून अभिषेक खुप इमोशनल झाला आणि त्याने याचा फोटो इंस्टाग्रामवर शे्र केला. "जेव्हा तुम्ही 2 महिन्यानंतर ऑफिसमध्ये जाता आणि मुलीने तुमच्यासाठी असे नोट सोडलेले असते. #mydaughterbestest"
- अभिषेकने 2007 मध्ये ऐश्वर्या रायसोबत लग्न केले होते. 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. सध्या आराध्या मुंबईच्या धीरुभाई अंबानीच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतेय.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आराध्या बच्चनचे निवडक फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.