आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11th Wedding Ann: मेंदीपासून ते पाठवणीपर्यंत, पाहा ऐश्वर्या-अभिषेकचे लग्नाचे फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या शाही लग्नसोहळ्याची नेहमीच चर्चा होत असते. याच शाही लग्नसोहळ्यांपैकी एक लग्न म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्याचे. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक 20 एप्रिल 2007 रोजी माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनसोबत विवाहबद्ध झाला.  अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा आज 11 वा वाढदिवस आहे. या दाम्पत्याला पाच वर्षांची मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे. 

 

'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमात पहिल्यांदा अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र काम केले होते. त्यानंतर ही जोडी 'उमराव जान' या सिनेमात झळकली होती. याच काळात दोघांचे सूत जुळले. असे म्हटले जाते, की 'गुरु' या सिनेमाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. 

 

खरं तर ऐश्वर्यापूर्वी करिश्मा कपूरसोबत अभिषेकचे लग्न ठरले होते. ऑक्टोबर 2002 मध्ये दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र जानेवारी 2003 मध्ये त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी ऐश्वर्याची एन्ट्री अभिषेकच्या आयुष्यात झाली. मुंबईच्या रस्त्यांवरुन अभिषेकची वरात निघाली, तेव्हा चाहत्यांची मोठी गर्दी तेथे जमली होती. अभिषेकने सेहरा बाजुला करुन आपल्या चाहत्यांना अभिवादन केले होते. या लग्नात बॉलिवूडसोबतच राजकारण, क्रिकेट, उद्योग जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची खास छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...