आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan Look In Fanne Khan Revealed, See Some Modelling Day Photos

'फन्ने खान'मधील ऐश्वर्याचा लूक रिलीज, मॉडेलिंग काळात अशी दिसायची माजी जगतसुंदरी, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटातील तिचा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘क्रिअर्ज एंटरटेन्मेंट’ने ट्विटरवर तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या, अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘एव्हरीबडीज फेमस’ (२०००) या चित्रपटाच्या कथेवर ‘फन्ने खान’ची कथा आधारित आहे. काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर मिलिटरी जॅकेटमधील ऐश्वर्याचा हा लूक काहीसा ‘ऐ दिल है मुश्कील’मधील लूकसारखा वाटतो. ‘एव्हरीबडीज फेमस’ची कथा एका पित्याची आहे, जो आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार असतो. गायनक्षेत्रात आपल्या मुलीचं नाव होण्यासाठी तो देशातल्या प्रसिद्ध गायकाचंही अपहरण करतो. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित हा चित्रपट एक म्युझिकल ड्रामा असल्याचंही म्हटलं जात आहे. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर रिलीज होणारा ऐश्वर्याचा हा चौथा चित्रपट आहे. यापूर्वी ती जज्बा, सरबजीत आणि ऐ दिल है मुश्किल या चित्रपटांमध्ये झळकली होती. 
 


नववीत असताना मिळाली होती ऐश्वर्याला पहिली ऑफर...
बालपणी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न बाळगणा-या ऐश्वर्याचे मोठे होता होता मॉडेलिंगकडे लक्ष आकर्षित झाले होते. मॉडेलिंगची पहिली ऑफर तिला कॅमलिन कंपनीकडून मिळाली होती. त्यावेळी ती नववीत शिकत होती. त्यानंतर तिने कोक, फूजी आणि पेप्सी या जाहिरातींमध्ये काम केले आणि शिक्षणसुद्धा सुरु ठेवले होते.


1991मध्ये जिंकली होती सुपरमॉडेल कॉन्टेस्ट...
मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ऐश्वर्याने 1991मध्ये सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकली होती. फोर्डद्वारा आयोजित ही स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर ऐश्वर्याला व्होग या आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळाले होते. 1993 मध्ये अभिनेता आमिर खानसोबत पेप्सीच्या जाहिरातीत झळकल्यानंतर ऐश्वर्या चर्चित चेहरा बनली. 1994मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याचे आयुष्यच पालटून गेले.


अभिनयापेक्षा प्रभावी राहिले मॉडेलिंग...
जाणकारांनुसार, सिनेमांपेक्षा ऐश्वर्याची जादू मॉडेलिंग क्षेत्रात जास्त चालली. मॉडेलिंगमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता प्राप्त झाली. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्‍ड्सची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली. त्यामुळेच 2003 मध्ये तिला 'कान' या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरवर्षी ऐश्वर्या कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत असते.


ऐश्वर्याचे एंडोर्समेंट्स..
कॅमलिन पेन्सिलपासून सुरु झालेला ऐश्वर्याचा प्रवास आजही यशस्वीपणे सुरु आहे. टाइटन वॉचेज, लॉन्जिस वॉचेज, लॉरियल, कोका-कोला, लॅक्मे कॉस्मेटिक्स, फिलिप्स, पामोलिव, लक्स, फूजी फिल्म्स, नक्षत्र डायमंड्स, कल्याण ज्वेलर्स, प्रेस्टीज यांसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी ऐश्वर्याने काम केले आहे. 


पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिनेसृष्टीत एन्ट्री घेण्यापूर्वीचे ऐश्वर्या राय बच्चनचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...