आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Spoke For Every Woman At Cannes ऐश्वर्या म्हणाली 'मेकअप करण्याच्या अर्थ महिला मुर्ख असतात असा होत नाही'

ऐश्वर्या म्हणाली - 'मेकअप करण्याच्या अर्थ महिला मुर्ख असतात असा होत नाही'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने अलीकडेच कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये मीडियाशी बातचित केली. यावेळी तिला समजातील महिलांच्या सद्यस्थितीवर प्रश्न विचारले गेले. एका प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, ""मेकअप करणा-या महिला या मुर्ख असतात, असा अर्थ होत नाही. त्या संवेदनशील नसतात, असं मानणं पुर्णपणे चुकीचे आहे. "" ऐश्वर्या यंदा 11 आणि 12 मे रोजी कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. आता ती कानवारी करुन मुंबईत परतली आहे. 


 मुलाखतीत काय म्हणाली ऐश्वर्या...
- ऐश्वर्या म्हणाली, ''जगात सुंदर या शब्दाची संकल्पनाच वेगळी आहे. त्यातून महिलांचे सौंदर्य हे वर्ण, झिरो फिगर या मानसिकतेची फुटपट्टी लावून मोजलं जातं.'' 
- ''आपण महिलांनी एकमेकींना चुकीच्या पद्धतीनं पारखणं किंवा एकमेकींविषयीचे चुकीचे अंदाज बांधणं वेळीचं थांबवलं पाहिजे. महिला बुद्धीवान नसतात, त्या संवदेनशील, दयाळू नसतात, असा जो पुर्वग्रह आहे, तो वेळीच बदलला पाहिजे'', असेही ऐश्वर्या म्हणाली. 
- कानमध्ये ऐश्वराने नेहमीप्रमाणे आपल्या डिझायनर आउटफिट्स, स्टाइल आणि अॅटीट्यूडने सगळ्यांना इम्प्रेस केले.
- ऐश्वर्या मागील 17 वर्षांपासून कानमध्ये सहभागी होत आहे. 
- ऐश्वर्याने लॉरिअल पॅरिस या जगप्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची सदिच्छादूत म्हणून कानमध्ये हजेरी लावली होती.  
- तिने डिझायनर मिशेल सिनको यांचा पीकॉक मोटिफ गाऊन परिधान केला होता.
- दुसरे दिवशी (12 मे) तिने डिझायनर रामी कदी (Rami Kadi) यांनी डिझाइन केलेला सिल्व्हर गाऊन परिधान केला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, ऐश्वर्या राय बच्चन हिचे कानमधील निवडक फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...