आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

All is not Well! अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये ऐश्वर्याने केले नणंदेकडे सपशेल दुर्लक्ष, तुम्हीच बघा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 26 डिसेंबर रोजी मुंबईत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन झाले. या पार्टीला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि थोरली मुलगी श्वेतासोबत नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा द्यायला पोहोचले. पण याठिकाणी एक वेगळीच गोष्ट सगळ्यांसमोर घडली. ती म्हणजे ऐश्वर्या तिची नणंद श्वेता नंदा बच्चन हिच्याकडे सपशेल दु्र्लक्ष करताना कॅमे-यात कैद झाली. 

 

एकमेकींशी एकही शब्द बोलल्या नाहीत ऐश्वर्या-श्वेता..
मुंबईतील लोअर परेलस्थित हॉटेल सेंट रेगिंस येथे हे चौघेही सोबत पोहोचले. पण श्वेता पूर्णवेळ बिग बींसोबतच होती. तर ऐश्वर्या अभिषेकसोबत हातात हात घालून रिसेप्शनस्थळी दाखल झाली. यावेळी दोघींमध्ये असलेला दुरावा स्पष्ट दिसत होता. दोघींमध्ये काहीच बोलणे झाले नाही. इतकेच नाही अभिषेक-ऐश्वर्या आणि बिग बी-श्वेता वेगवेगळे मीडियाला पोज देत होते. जेव्हा मीडियाने चौघांना एकत्र येऊन पोज द्यायला सांगितली, तेव्हा श्वेता आणि ऐश्वर्याने ठराविक अंतर ठेऊन कॅमे-यासाठी पोज दिली. यावेळी दोघींनीही एकमेकींकडे बघायचेही टाळले. दोघीही अभिषेक आणि बिग बींच्या मध्ये उभ्या झाल्या, पण एकमेकींना त्या सपशेल टाळताना दिसल्या. यावेळी दोघींमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे बच्चन कुटुंबात ऐश्वर्या आणि श्वेताच्या नात्यात ठिणगी पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, ऐश्वर्या आणि श्वेता एकमेकींना कशा टाळताना दिसल्या...      

बातम्या आणखी आहेत...